समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात,पाहा पक्ष आणि मतदारसंघ ?

Sameer Wankhede in the election arena, see the party and constituency?

 

 

 

 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र विधानसभेची मुदत आहे.

 

महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. युती-आघाडीची जागावाटपावर बोलणी सुरु आहे. कुठला पक्ष,

 

किती जागा लढवणार ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय. सूत्रांच्या हवाल्याने वेगवेगळे आकडे सांगितले जात आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका अधिकाऱ्याच नाव चर्चेत आहे,

 

ते म्हणजे समीर वानखेडे. डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. तीन वर्षांपूर्वी समीर वानखेडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलं होतं.

 

समीर वानखेडे यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार होतं. समीर वानखेडे यांच्यावर त्यावेळी अनेक आरोप सुद्धा झाले होते.

 

 

हेच समीर वानखेडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे मुंबईच्या धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ते निवडणूक रिंगणात उतरु शकतात.

 

या संदर्भात त्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत बोलणी फायनल झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हाय प्रोफाइल IRS अधिकारी

 

समीर वानखेडे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा अशी तीन पक्षांची मिळून महायुती आहे.

 

 

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी समीर वानखेडे यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. काही महिन्यांपूर्वी ते राजकारणात उतरणार अशी चर्चा होती.

 

 

राजीनामा दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात सहभागी होतील, धारावी हा मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा परंपरागत मतदारसंघ आहे.

 

त्या धारावीमधून आमदार होत्या. पण 2024 ला खासदारकीची निवडणूक जिंकून त्या लोकसभेवर गेल्या. 2019 साली शिवसेनेने धारावीमधून आशिष वसंत मोरे यांना उमेदवारी दिली होती.

 

पण वर्षा गायकवाड यांनी शिवसेना उमेदवाराचा दारुण पराभव केलेला. आता महायुती या मतदारसंघाला हॉट सीट बनवण्याच्या विचारात आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *