धनंजय मुंडे – करुणा शर्मां प्रकरणात मुंडेंना न्यायालयाचा मोठा धक्का
Dhananjay Munde - A big blow to Munde in the Karuna Sharma case.

करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आहे.
करुणा मुंडे यांना दिलासा देत न्यायालयाने त्यांची दोन लाखांची पोटगी कायम ठेवली आहे. या आधी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटगी देण्यात यावी असा निकाल दिला होता. त्या विरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
शनिवारी झालेल्या अंतिम सुनावणीवेळी करुणा शर्मा यांच्याकडून महत्वाची कागदपत्रे पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली. धनंजय मुंडेंच अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र या दोन महत्वाची कागदपत्रांचा पुराव्यात समावेश करण्यात आला. याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना न्यायालयाने दिलासा दिला.
करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
करुणा शर्मांना पोटगीचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम राहणार.
धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटगी द्यावी लागणार.
करुणा शर्मा मुंडे यांनी न्यायालयात लग्नासंदर्भातलं धनंजय मुंडे यांचं स्वीकृतीपत्रही सादर केलं. या पत्रात धनंजय मुंडे यांनी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीने करुणा यांच्याशी लग्न केल्याचा उल्लेख आहे.
तसंच आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन राजश्री यांच्यासोबत दुसरं लग्न केल्याचाही उल्लेख पाहायला मिळतोय. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मात्र हे स्वीकृतीपत्र खोटं असल्याचं म्हणत सर्व दावे फेटाळले..
– धनंजय मुंडे यांचे स्वत:चे स्वीकृतीपत्र असल्याचे सांगत करुणा मुंडे यांनी कोर्टात ते सादर केलं.
– स्वीकृतिपत्रात करुणा मुंडेंशी धनंजय मुंडे यांनी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा उल्लेख
– आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरे लग्न केले, पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही असाही उल्लेख.
– मी करुणा मुंडे आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार असल्याचा स्वीकृतिपत्रात उल्लेख.
– हे स्वीकृतीपत्र खोटे असल्याचा धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा कोर्टात दावा.
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. मला जो प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला धनंजय मुंडे 20 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला. यात त्यांनी धनंजय मुंडेंसह घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्करवर यांच्या नावांचाही उल्लेख शर्मा यांनी केला.
आपल्याला मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून हिरॉईनची ऑफर होती असं करुणा शर्मा म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी आपल्या बदनामीचा कट रचल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला. हे आरोप करताना करुणा शर्मा यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं पहायला मिळालं.