इरफान पठाण च्या माध्यमातून ममता करणार काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा गेम !
Mamata will play the big Congress leader game through Irfan Pathan!
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. TMC प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र निवडणुकांच्या घोषणेसह सर्व 42 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे बहारमपूरमधून ममता यांनी क्रिकेटर युसूफ पठाण यांना तिकीट दिले आहे. अधीर रंजन चौधरी हे मतदारसंघातून खासदार आहेत.
हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. 1999 पासून ते येथून खासदार आहेत. युसूफ पठाण यांच्या उमेदवारीने या जागेवरील लढत अटीतटीची झाल्याचे दिसत आहे.
वास्तविक, अधीर रंजन चौधरी प्रत्येक मुद्द्यावर ममता सरकारची कोंडी करत आहेत. जेव्हा बंगालमध्ये जागावाटपाबाबत काँग्रेस आणि टीएमसीमध्ये चर्चा सुरू होती.
त्यानंतरही अधीर रंजन ममता सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नव्हते. काँग्रेससोबत युती न करण्यामागचे कारणही
टीएमसी नेत्यांनी अधीर रंजन चौधरी हे असल्याचे सांगितले होते. आता ममताने प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाणला अधीर रंजन याना रोखण्यासाठी मैदानात उतरवले आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, बहरमपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे 52% मुस्लिम मतदार आहेत. तर येथे 13.2% SC आणि 0.9% ST मतदार आहेत.
अशा स्थितीत ममता बॅनर्जींनी या जागेवरून काँग्रेसची मुस्लिम मते विभागण्यासाठी मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली आहे.
भाजपने पश्चिम बंगालमधील 20 जागांसाठी उमेदवारही जाहीर केले आहेत. यामध्ये बहरामपूरचाही समावेश आहे. भाजपने येथून निर्मलकुमार साहा यांना उमेदवारी दिली आहे. म्हणजेच या जागेवर आता तिरंगी लढत अपेक्षित आहे.
अधीर रंजन यांची बहारमपूर सीटवर चांगली पकड असल्याचे मानले जाते. 1999 पासून ते या जागेवरून खासदार आहेत. या जागेवरून त्यांनी सलग 5 वेळा निवडणूक जिंकली. यापूर्वी ही जागा रासपकडे होती.