मोदींचे धक्कातंत्र ;दिग्गजांना नारळ अगदी नवख्या आमदाराला केले राजस्थानचा मुख्यमंत्री
Modi's shock tactics: The Chief Minister of Rajasthan gave coconuts to the veterans even to the new MLA
मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंह मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना भाजपने तिथे नेतृत्वबदल केल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.
वसुंधराराजे, दिया कुमार यांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. परंतु भाजपने पुन्हा धक्कातंत्र वापरत अखेर भजनलाल शर्मा यांची राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केलीये. त्यामुळे वसुंधराराजे यांचं राजस्थानमधील महत्त्व कमी झालंय का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजनाथ सिंह, प्रल्हाद जोशी आणि विनोद तावडे यांचं पर्यवेक्षक मंडळ आज सकाळी जयपूरला रवाना झालं. तिथे त्यांनी नवनिर्वाचित आमदारांशी सविस्तर चर्चा केली.
दुपारी ४ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडल्यानंतर सर्व आमदारांच्या पाठिंब्याने विधिमंडळ नेता म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भजनलाल शर्मा सांगानेरचे आमदार असून भाजपचे सरचिटणीस आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या आमदारांनी त्यांना आपला नेता म्हणून पसंती दिली. निरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांची भेट घेतली होती.
राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत सतत अटकळ होती. ३ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले होते.
तेव्हापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा रंगली होती. माध्यमे असोत वा जनता, प्रत्येकाला राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घ्यायचे होते.
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे ते दिया कुमार, बाबा बालकनाथ योगी अशा अनेक नावांची चर्चा होती. मात्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपने पूर्णपणे नव्या चेहऱ्याकडे कमान सोपवून सर्वांनाच चकित केले.
भजनलाल शर्मा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येईल, याची कोणालाच कल्पना नव्हती. चला जाणून घेऊया, कोण आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा?
भजनलाल शर्मा हे राजस्थानमधील सांगानेरचे आमदार असून त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. याआधी ते चार वेळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीसही राहिले होते.
2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना सांगानेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि 48 हजारांहून अधिक मतांनी ते विजयी झाले.
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल यांच्या नावाची घोषणा केली.
#WATCH | BJP central observers for Rajasthan, Rajnath Singh, Vinod Tawde, Saroj Pandey along with Union Minister Pralhad Joshi, BJP leaders CP Joshi, Vasundhara Raje and other leaders at the BJP office in Jaipur. pic.twitter.com/ek4RXxyyq5
— ANI (@ANI) December 12, 2023