उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक ;फडणवीसांना डिवचले

Uddhav Thackeray is aggressive again; Fadnavis is confused

 

 

 

 

पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत आहेत. या पक्षात मला मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर तसंच अजित पवारांवरही टीका केली.

 

मी हल्ली गद्दारांचा उल्लेख करतच नाही कारण लोकसभा निवडणुकीतच गद्दार मेलेले आहेत. आपण २८८ उमेदवार उभे केले, तर १६० जागा निवडून येतील.

 

पण आपण महाविकास आघाडीत आहोत, यात आपल्याकडेच नेतृत्व राहण्यासाठी आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे, असं म्हणत त्यांनी पुणेकरांना विधानसभेसाठी आवाहन केलं आहे.

 

काही जणांना वाटतं मी त्याला आव्हान दिलं, मी कोणत्याही ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा सुसंस्कृत महाराष्ट्रात आणि तू म्हणजे चोऱ्या करणारा.

 

तुमच्या नादाला लागण्या इतक्या कुवतीचे तुम्ही नाही. खरं तर मी जाहीर सभाच घेणार होतो कारण आता लढाई मैदानात होणार, हॉलमध्ये होणार नाही.

 

जस मी बोललो एक तर मी राहीन किंवा तू राहशील. माझ्या पायाशी कोणीतरी टरबूज ठेवलंय काही जणांना वाटतं मी त्यांना आव्हान दिले.

 

पण मी कोणत्याही ढेकणांना आव्हान देत नाही, ढेकनांना आव्हान द्यायचं नसतं, तर त्यांना अंगठ्याने चिरडायचे असते. मी म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र आणि तू म्हणजे दरोडेखोर, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

 

मला पुण्याचा शास्वत विकास करायचा आहे, मी लक्ष घातलं नाही कारण इथले सुभेदार बसले होते. म्हटलं करत असाल तर करा चांगभलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला.

 

राम मंदिर गळतं तसंच नवं संसद भवन देखील गळतं आहे. ज्याने संसद भवन बांधलं तोच पुण्यातील नदी बुजवतोय तीही औरंगजेबच्या राज्यातीलच आहे.

 

आधी १२ महिन्यात संसद भवन गळतंय आणि हिशोब ७० वर्षांचा मागतात. तुमचं सगळंच गळतंय, राम मंदिर, संसद भवन याला गळती सरकारचं म्हणावं लागेल, असं म्हणत त्यांनी मोदींसह विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

 

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मशाल ही निशाणी जाणीवपूर्वक निवडली. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. ५० वर्षात नक्की निकाल लागेल.

 

आता मी न्याय मागायला जनतेच्या न्यायलयात जातं आहे, आजपासून जनतेच्या न्यायालयात लढाई सुरु झाली आहे. कोर्टाला आज शेवटची विनंती करतो.

 

नाहीतर आता नाद सोडतो. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी फक्त आमची नाही. न्याय मिळण्यासाठी विलंब होत असेल तर आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ. हा लढा उद्धव ठाकरेंचा नाही हा लढा छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे.

 

लाडकी बहिण योजना देऊन तुम्ही मत विकत घेत आहात? असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. भिकेवर जगणारा नाही.

 

 

१५०० रुपयात घर चालवणार आहात का? हक्काचं मागितल तर ईडी आणि सीबीआय मागे लावतात. हेच मोदी शाह यांचे धोरण आहे. हा लढा उद्धव ठाकरे अथवा शिवसेनेचा नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *