शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर;पाहा कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी?
The second list of 15 candidates of the Shiv Sena Thackeray group has been announced; see who has a chance from which constituency?
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.
आज (२६ ऑक्टोबर) शिवसेना (ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती.
यानंतर आज १५ उमेदवारांची घोषणा ‘सामना’मधून करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली,
देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघाचा सहभाग आहे.
शिवडीमधून अजय चौधरी, धुळे शहर-अनिल गोटे, चोपडा-राजू तडवी, जळगाव शहर-जयश्री सुनील महाजन, बुलढाणा-जयश्री शेळके, दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल,
हिंगोली-रूपाली राजेश पाटील, परतूर-आसाराम बोराडे, देवळाली-योगेश घोलप, कल्याण पश्चिम-सचिन बासरे, कल्याण पूर्व-धनंजय बोडारे, वडाळा-श्रद्धा श्रीधर जाधव,
भायखळा-मनोज जामसुतकर, श्रीगोंदा-अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली- संदेश भास्कर पारकर यांचा समावेश आहे.
कोणत्या १५ उमेदवारांची घोषणा? वाचा यादी!
मतदारसंघाचे नाव उमेदवार
१ शिवडी अजय चौधरी
२ धुळे शहर अनिल गोटे
३ चोपडा राजू तडवी
४ जळगाव शहर जयश्री सुनील महाजन
५ बुलढाणा जयश्री शेळके
६ दिग्रस पवन श्यामलाल जयस्वाल
७ हिंगोली रुपाली राजेश पाटील
८ परतूर आसाराम बोराडे
९ देवळाली योगेश घोलप
१० कल्याण पश्चिम सचिन बासरे
११ कल्याण पूर्व धनंजय बोडारे
१२ वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव
१३ भायखळा मनोज जामसुतकर
१४ श्रीगोंदा अनुराधा राजेंद्र नागावडे
१५ कणकवली संदेश भास्कर पारकर
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता.
मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि कॉग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या कधी येतात? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.