काँग्रेस आमदाराची आमदारकी रद्द

Congress MLA's MLA canceled

 

 

 

 

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे सावनेरचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. तशी अधिसूचना विधिमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आली.

 

 

 

केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली होती. कोणत्याही लोक प्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होते असा कायदा आहे.

 

 

त्यानुसार केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. केदार सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार घेत आहेत. काँग्रेससाठी हा धक्का मानला जातो.

 

 

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वीस वर्षांपूर्वी झालेल्या १५० कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्यातील प्रमुख आरोपी व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष काँग्रेस नेते सुनील केदार यांना

 

 

नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. हा घोटाळा नेमका आहे काय आणि न्यायालयात दीर्घकाळ हा खटला का चालला याविषयी.

 

 

सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष असताना बँकेने सन २००१-२००२ मध्ये होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड,

 

 

सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खासगी कंपन्यांच्या मदतीने १५० कोटी रुपयांचे रोखे (शेअर्स) खरेदी केले होते.

 

 

सहकार कायद्यानुसार बँकेच्या संचालक मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय बँकेची रक्कम इतरत्र गुंतवण्यास मनाई आहे. रोखे खरेदीमुळे या नियमाचे उल्लंघन झाले.

 

 

 

या कंपन्यांनी बँकेला खरेदी केलेले रोखे दिले नाही आणि पुढच्या काळात या खासगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. त्यामुळे बँकेचे व पर्यायाने बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडाले होते.

 

 

 

याप्रकरणी सुनील केदार आणि अन्य आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले होते व केदार यांना अटकही करण्यात आली होती.

 

 

दरम्यान मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास तसेच साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

 

 

त्यानंतर त्यांना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल रुग्णालयात आणले. येथे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. मायग्रेनसह छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली.

 

 

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) मेडिसीनच्या वॉर्ड क्रमांक ५२ या अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर माजी मंत्री तसेच आमदार सुनील केदार यांचा शनिवारी (ता.२३) एमआरआय काढण्यात आला.

 

 

 

याशिवाय ईसीजी, इकोसह इतरही रक्ताच्या बऱ्याच चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांना मायग्रेनचा (अर्धशिशी) जुना त्रास असल्यामुळे केदार यांना दोन लिटर ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. ऑक्सिजनवर ठेवल्यानंतर डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

 

 

अलीकडेच एका ड्रग्ज प्रकरणात पुणे मेडिकल कॉलेजने ललित पाटील या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे तेथील अधिष्ठातांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

 

यातून धडा घेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांनी माजी मंत्री सुनील केदार यांच्यासाठीही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

 

 

 

शिक्षा सुनावलेल्या कैदी रुग्णाचा रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत दर तीन दिवसांनी डॉक्टरांच्या पथकाला छाननी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कैदी रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी वाढवायचा असल्यास अधिष्ठातांना सूचना करण्याचेही आदेश दिले आहेत.

 

 

 

या खेरीज कैदी रुग्णास विनाकारण दीर्घ काळ रुग्णालयात दाखल केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित पथकप्रमुखाला जबाबदार धरून कारवाई होईल, अशी तंबी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे केदार यांच्या चाचणीनंतर डॉक्टरांकडून सादर होणाऱ्या अहवालावर केदार यांचा रुग्णालयातील कालावधी निश्चित होणार आहे.

 

 

 

 

त्यानुसार डॉक्टरांनी केदार शुक्रवारी ईसीजी काढले. रक्ताच्या चाचण्यांसह इतरही काही चाचण्या केल्या. छातीचा ईसीजी काढण्यात आल्यानंतर त्यात काही बदल आढळल्यामुळे त्यांना तत्काळ मेडिसिन विभागाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. शनिवारी सुरुवातीला सीटी स्कॅन केले.

 

 

यानंतर एमआरआय काढले. ईसीजी दिसून आलेले बदल आधीचे आहे की आतचे, हे तपासले जात आहे. शनिवारीही केदार यांची ईसीजी, इको, रक्तासह मेंदूशी संबंधित बऱ्याच चाचण्या झाल्या. सीटी स्कॅन व एमआरआय तपासणीही झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

 

 

 

 

सुनील केदार यांना मागील दहा- बारा दिवसांपासून सर्दी-खोकला आणि घशात खवखव असल्याचे पुढे येत आहे. यामुळे त्यांची कोरोना चाचणीही करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली असल्याची शंका वर्तविण्यात आली. याशिवाय त्यांना मायग्रेनचा त्रास असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. केदार दाखल असलेल्या अतिदक्षता विभागाच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *