मराठा आणि ओबीसीमध्ये तणावावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

What did Pankaja Munde say about the tension between Marathas and OBCs?

 

 

 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड शहारातील जाळपोळ आणि दगडफेक झालेल्या ठिकाणांची पाहणी केलीय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जाळपोळ,

 

 

 

आमदरांची घरे जाळण्याचा प्रकार घडला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दुर्देवी घटना घडलीय, याचा निषेध करत असल्याचं त्या म्हणाल्या.

 

 

 

 

आरक्षणासाठी बीडमध्ये झालेल्या आंदोलनात जाळपोळच्या घटना घडल्या होत्या. या जाळपोळच्या ठिकाणांची पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पाहणी केली.

 

 

 

यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्यासह पोलीस प्रशासनासोबत संवाद साधला. पाहणी केल्यानंतर पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला.

 

 

 

राज्यात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी जाळपोळच्या घटना घडल्या होत्या. काही समाजकंटकांनी लोक प्रतिनीधींचे घरे पेटवली होती. घरातील लेकरांचा काय दोष होता.

 

 

 

जे घडलं आहे ते अप्रिय आहे. मी सर्व ठिकाणी जाऊन पाहणी केली. सर्व पाहून दुःख झालं. महाराष्ट्राला संस्कृती आहे हे आता शेवट असला पाहिजे. उद्रेक होईल म्हणून काही बोललं नाही.

 

 

 

मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधी ओबीसी समाजाची देखील आंदोलने झाली परंतु, असं काही झाले. आम्हीदेखील रस्त्यावर उतरलो तर अवघड होऊन जाईल.

 

 

 

 

 

आम्हीदेखील उपोषण करू, असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला. बीडमधील जाळपोळ आणि हिंसाचार यासह अंतरवली सराटीमधील लाठी चार्जची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

 

 

पोलिसांचे इंटेलिजन्स कमी पडल्याची खंत देखील त्यानी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण देताना जन्माने मागास असलेल्या आरक्षणाला

 

 

 

धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ओबीसी- मराठा वाद लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

 

 

 

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीडमध्ये जाळपोळ, दगडफेक झाली होती. यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही ठिकाणांना भेटी दिल्या.

 

 

 

बीड येथील भाजप कार्यालय, शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय, क्षीरसागर यांचे निवासस्थान, सोळंके यांचे निवासस्थान , सुभाष राऊत यांचे हॉटेल या ठिकाणांना पंकजा मुंडे यांनी भेटी दिल्या.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *