जरांगे पटलावर आता आंदोलनातील महिलेचे गंभीर आरोप
Serious accusations of the woman in the movement are now on the Jarange board
मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर असतानाच आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांची राळ उठलेली दिसतेय.
मराठा आरक्षण आंदोलनात सहकारी राहिलेल्या लोकांकडूनच मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. काल अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आज महिला आंदोलकाने मनोज जरांगेंवर आरोप केलेत.
मराठा आंदोलन कर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील वागतात, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे.
शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं. म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला.
पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी लावले होते. टोपी घालून मनोज जरांगे अख्खं पुणे फिरले. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात.
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.
मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेड बनवलं. तिथे अंतरवलीत दंगल घडली का घडवली गेली?, सरकारने शोध लावावा. मनोज जरांगे कोण हे मिडीयाला सुद्धा माहिती नव्हतं.
मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केलं होतं.
तेव्हा ते लोकं मला गलिच्छ भाषेत बोलत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. मी त्यांचा विरोध करतेय, असं त्या म्हणाल्या.
पण आता एक ते दीड महिन्यांपासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करत आहे. विष बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय. मनोज जरांगे कोणाला ही मंदिर विश्वासात घेत नव्हते.
फक्त एक फोन ज्याचा येत होता, त्यांना मनोज विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता, असं संगिता वानखेडे म्हणाल्या आहेत.
दरम्यान मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात समंत झाले. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली.
सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील २४ फेब्रुवारीपासून मोठे आंदोलन सुरु करणार आहे. आता हे आंदोलन गावागावात असणार आहे.
प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यानंतर २९ फेब्रुवारीपासून मराठा समाजातील म्हतारे उपोषणास बसणार आहे. तसेच ३ मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळीची वेळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
3 मार्च लग्नाचा मुहूर्त मोठ्या प्रमाणावर आहे. या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी लग्नाचे मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी असणारी लग्न संध्याकाळी लावावी. कारण या दिवशी सर्वात मोठा रास्तो रोको आंदोलन निश्चित झाला आहे.
त्यामुळे लग्न करणाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे या दिवशी मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही दुपारचे लग्न संध्याकाळी करावी.
लग्नास सर्व समाजातील लोक येत असतात. या दिवशी सर्व जण रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील. या रास्ता रोको आंदोलनात नवरदेव नवरी सहभागी होतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
आजपासून ३ मार्चच्या रास्ता रोको आंदोलनाची तयारी सुरु करा. या दिवशीचा रास्ता रोको आंदोलन असे करा की, संपूर्ण देशात असे आंदोलन झाले नसले.
या दिवशी एकाच वेळी, एकाच ठिकाणी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दोन दिवस सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वाट पाहिली जाणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून २९ रोज रास्ता रोको होणार आहे.
तसेच २९ पासून मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसवायचे आहे. आंदोलना दरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार राहणार आहे.
आपल्या राज्यात 25 ते 30 लाख म्हतारे असतील. माझ्या आई-बाबसह सर्व म्हातारे उपोषण करतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.