महायुतीचे जागावाटप;चर्चेत शिंदेंना उद्देशून अमित शहांनी करून दिली आठवण

Allocation of seats of Mahayuti; Amit Shah reminded Shinde in the discussion

 

 

 

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीला आजपासून प्रारंभ झालेला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.

 

२० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. त्यामुळे सत्ताधारी महायुतीनं जागावाटपाच्या चर्चांना वेग दिला आहे.

 

या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यागाची आठवण करुन दिली. शहांनी केलेलं विधान सूचक मानलं जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात केवळ १७ जागा मिळाल्या. भाजप, अजित पवार गटाचा विचार करता शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट जास्त राहिला. त्याचाच आधार घेत शिंदेसेनेनं विधानसभा निवडणुकीत १०० जागांची मागणी केली.

 

शिंदेसेनेला १०० जागा सोडल्यास अजित पवार गटाचं काय करायचं, त्यांना कसं सामावून घ्यायचं, असा प्रश्न भाजपसमोर आहे. यावर भाष्य करताना अमित शहांनी शिंदेंना भाजपच्या त्यागाचं स्मरण करुन दिलं.

 

‘मुख्यमंत्रिपद महत्त्वाचं असतं. ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला,’ असं शहा शिंदेंना उद्देशून म्हणाले. ‘मुख्यमंत्री, पंतप्रधान, प्रांत ही पदं महत्त्वाची असतात.

 

गृहमंत्री आणि इतर पदं ही काम करुन घेण्यासाठी केलेली व्यवस्था असते. तुम्हाला पद देताना आमच्या माणसांनी त्याग केलेला आहे.

 

त्यामुळे आता तुम्ही जागावाटपात मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं,’ असं शहा म्हणाले. एबीपी माझानं महायुतीच्या बैठकीत उभ्या असलेल्या एका नेत्याच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

 

ज्याप्रकारे तहसीलदार, जिल्हाधिकारी ही पदं प्रशासनात महत्त्वाची असतात, त्याप्रमाणे सरकारमध्ये मुख्यमंत्री, पंतप्रधान ही पदं महत्त्वाची असतात. बाकीची पदं ही केवळ व्यवस्था असते.

 

तुम्हाला मुख्यमंत्रिपद देताना आमच्या माणसांनी त्याग केलेला आहे, असं शहा जागावाटपाच्या बैठकीत म्हणाले. आम्ही तुमच्यासाठी त्याग केला, आता तुम्ही मित्रपक्षासाठी त्याग करा, असं शहांनी शिंदेंना सुचवलं.

 

 

अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्येच राहणार आणि त्यांना सोबत घेताना देण्यात आलेली आश्वासनं जागावाटपात पूर्ण केली जाणार, असे संकेत शहांनी बैठकीत दिले.

 

तुम्हाला सोबत घेताना आम्ही त्याग केला. आता तुम्ही तडजोड करा आणि तिसऱ्या भावाला सामावून घेताना थोडी लवचिक भूमिका घ्या, असं शहांनी शिंदेंना सुचवलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *