काँग्रेसचा दिवाळी धमाका; ठाकरे गटाचा प्रवक्ता गळाला

Congress's Diwali blast; Spokesperson of the Thackeray group passed away

 

 

 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि एकेकाळचे छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक, समता परिषदेचे समन्वयक किशोर कान्हेरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

 

दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला,

 

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

 

दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

 

महाविकास आघाडीच्या गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. आज (21 ऑक्टोबर) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर होणार आहे.

 

कोणता पक्ष किती जागांवर लढणार याचा निर्णय उद्याच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे. आमचं सगळं ठरलं आहे. त्यामुळं उद्या जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली.

 

भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे.

 

या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत.

 

भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे.

 

श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *