पंकजा मुंडेंच्या “त्या” वक्तव्यावर छगन भुजबळांची तिखट प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal's sharp reaction to Pankaja Munde's "that" statement

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी बुधवारी (२४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस होता.
या प्रचाराच्या सभेत बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं. “प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चां रंगल्या आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेवारी दिली.
त्यामुळे प्रीतम मुंडे यांचं काय? त्यांना भारतीय जनता पार्टीकडून दुसरी कोणती जबाबदारी देण्यात येणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत होते. यातच पंकजा मुंडे यांनी बीडच्या सभेत प्रीतम मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केलं.
“प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे.
ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या पक्षात रस्सीखेच सुरू असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक लोकसभेतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर मात्र, राष्ट्रवादीने या जागेवर दावा कायम असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले होते.
यातच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांना मी नाशिकमधून उभे करेल असे म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंसंदर्भात वक्तव्य केलं. त्यामुळे महायुतीमधल्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थतात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीडमधून पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडेंच काय? हा प्रश्न निर्माण होतो. मागच्या 10 वर्षांपासून प्रतीम मुंडे बीडमधून खासदार आहेत. पंकजा मुंडेंच्या उमेदवारीमुळे त्या विस्थापित झाल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी काल प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून उभं करेन असं वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. आज अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
त्यांना, पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देण्याविषयी वक्तव्य केलं, त्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की,
“पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे”
“आमच्याशी भुजबळांची काही चर्चा झालेली नाही. मात्र, तिकडे त्यांची खूप अवहेलना होत आहे, त्यांची काळजी वाटते” असा जयंत पाटील यांनी छगन भुजबळांना टोला लगावला.
“एकनाथ खडसे यांचा विचार झाला आहे भाजपमध्ये जाण्याचा, आता भाजपचे टाईमटेबल बघून त्यांचा पक्षप्रवेश होईल कदाचित.
शरद पवारांनी कधीही कोलांटया उड्या मारल्या नाहीत, उलट तुम्ही किती कोलांट्या मारल्या हे आम्हाला माहिती आहे” असं जयंत पाटील म्हणाले.
प्रीतम मुंडे यांचा विवाह नाशिकचा डॉक्टर खाडे यांच्याशी झाला आहे. मात्र डॉक्टर खाडे आणि प्रीतम मुंडे दोघेही नाशिकला राहात नाहीत.
ते अपवादानेच नाशिकला येत असतात. प्रीतम मुंडे यांचे सासर नाशिक असल्याने त्यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली.
नाशिक मतदारसंघात जागा वाटपाचा मोठा गोंधळ आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. साताऱ्यातून भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिल्याने त्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिकचा मतदारसंघ हवा आहे.
भारतीय जनता पक्षाने देखील आपल्या ओबीसी राजकारणाचा भाग म्हणून मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी या मतदारसंघावर दावा केला आहे.
हा सर्व गोंधळ उद्या निवडणूक प्रक्रिया सुरू होत असताना देखील मिटलेला नाही. आता पंकजा मुंडे यांच्या विधानाने त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे नाशिकचे राजकारण खऱ्या अर्थाने “घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे” असे झाले आहे.
या मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार गोडसे यांनी उमेदवारीच्या अपेक्षेने प्रचार देखील सुरू केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गट आला जय महाराष्ट्र करताना उमेदवारीच्या आश्वासनावरच शिंदे गटात प्रवेश केला आहे.
या स्थितीत खासदार गोडसे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची आहे. खासदार गोडसे यांनी
गेल्या महिन्याभरापासून आपल्या प्रचार देखील सुरू केलेला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे राजकारण एका नव्या वळणावर पोहोचले आहे.