पालकमंत्रीपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट

Minister Dhananjay Munde's address removed from the list of Guardian Ministers

 

 

 

राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता या यादीतून कट करण्यात आला आहे. त्यांच्याकडे बीड जिल्ह्याचा कारभार सोपवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

 

मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही. असे असतानाच पालकमंत्र्यांची नावे जाहीर होताच,

 

धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले असून मीच मला कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिद नको अशी विनंती केली होती, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

 

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासह बीड जिल्ह्याचाही कारभार ते पाहणार आहेत.

 

ही यादी जाहीर झाल्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको अशी विनंती मी केली होती.

 

ती मान्य करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत.

 

आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय.

 

यासह सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पाहण्यासाठी अजित पवार यांनी पालकमंत्री व्हावे, अशी मागणी केली जात होती.

 

त्यानुसार जनतेची भावना लक्षात घेता अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत, त्यानंतर आता बीड जिल्ह्यात भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *