राज्य सरकार महिलांना लवकरच देणार खूशखबर; मंत्र्यांनी दिली माहिती

The state government will give good news to women soon; Information given by the Minister ​

 

 

 

 

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी कृषी प्रदर्शनाचा मोठा लाभ होणार आहे. कृषी विभागाच्या योजनात महिलांना प्राधान्य दिले जाते, त्यासाठी महिलांचे सातबारावर नाव लावून घ्या.

 

 

 

राज्यातील महिलांना सरकार लवकरच खूशखबर देणार आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी येथील रेणुका कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

 

 

श्री. भुसे म्हणाले, कृषी क्षेत्रातील नवीन नवीन संशोधनाचा अनुभव या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे. गारपिटीने कांदा, टोमॅटोबरोबरच द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

 

शेतकऱ्यांना कमी दरात प्लास्टिक आच्छादन मिळण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या मालाला गावपातळीपासून राज्य पातळीवरील विक्रीसाठी व्यवस्था निर्माण केली जाईल.

 

 

नाशिक शहरात शंभर स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. पीकविम्याची पंचवीस टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल.

 

 

 

डॉ. कुंभार्डे यांनी जिल्हास्तरावरील कृषी प्रदर्शन चांदवड येथे भरविण्यात आल्यामुळे महिलांना प्रदर्शनात सहभागी होता आले. शेतीला पूरक व्यवसाय निर्माण होण्यासाठीचा हा उत्सव याठिकाणी सुरू आहे. इथे शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल.

 

 

महिला बचत गटांचे पस्तीस स्टॉल लावण्यात आले आहेत, यामुळे महिलांना मोठा वाव या प्रदर्शनात मिळाला असल्याचे सांगितले. आमदार डॉ. आहेर यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवीन बदल आत्मसात करायला हवेत असे आवाहन केले. वाबळे इव्हेंटचे अजय वाबळे यांनी प्रास्ताविक केले.

 

 

 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास भुजाडे, द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले, शिवनाथ बोरसे, शरद आहेर, पंढरीनाथ खताळ, वाल्मीक वानखेडे, पुंडलिक गुंजाळ, संतोष जामदार, राजेंद्र गांगुर्डे, प्रा. विजय शेलार, दिगंबर वाघ, अशोक व्यवहारे, बाळासाहेब माळी, संदीप उगले, राजाभाऊ गिडगे, आदींसह महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *