शिक्षिका भाड्याने राहायला आली अन् महिलेच्या पतीला घेऊन पळाली
The teacher came to live on rent and ran away with the woman's husband
प्रेमात जात-पात, वय बघितलं जात नाही. काहीजण प्रेमासाठी वाट्टेल ते करतात. असाच काहीसा एक प्रकार बिहारमधून समोर आला आहे.
महिला पोलीसाच्या घरी भाड्याने राहण्यास आलेल्या शिक्षिकेने तिच्या पतीलाच घेऊन पळाल्याची घटना घडली आहे. या घटनेची एकच चर्चा परिसरात होत आहे.
महिला पोलीस आणि शिक्षिका एकाच गावात राहायच्या. शिक्षिका गावातील असल्याने महिला पोलिसाने तिला घरी राहण्यास जागा दिली.
मात्र, संधीचा गैरफायदा घेत महिला पोलिसाच्या पतीसोबत शिक्षिका फरार झाली. महिला पोलिसाने या दोघांची खूप शोधाशोध केली, मात्र तरी दोघे सापडले नाहीत.
महिला पोलिसाने तक्रारीत म्हटलं की, ‘पती आणि दोन वर्षांची मुलगी सैदनगर येथे भाड्याच्या घरात राहत होती. घरात सर्वकाही सुरळीत सुरु होतं.
मात्र, याचदरम्यान यूपीच्या वाराणसी जिल्ह्यातील एका गावातील तरुणी शिक्षिकेच्या नोकरीसाठी आली होती. बीपीएससीची परीक्षा पास झाल्याने तिला दरभंगा शहरातील एका शाळेत नोकरी मिळाली होती.
‘गेल्या एका महिन्यापासून शिक्षिका घरात राहत होती. ती अचानक निघून गेली. त्यानंतर नवराही कुठे दिसला नाही. काही वेळानंतर पतीचा महिला पोलिसाला फोन आला, त्याने म्हटलं की,
माझी नवी प्रेयसी ही घरी आलेली शिक्षिका आहे. आता मी आयुष्यभर तिच्यासोबत राहणार आहे. त्यामुळे तू आता घटस्फोट दे’. शिक्षिका आणि तिच्या वडिलांकडून धमकी दिली जात आहे, असा आरोपही महिला पोलिसाने केला आहे.
पतीने प्रेयसीसोबत फरार झाल्याने महिला पोलिसाला दोन वर्षाच्या मुलीला घेऊन वणवण फिरण्याची वेळ आली आहे. महिला पोलिसाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महिला पोलिसाला दिलं आहे.