मराठवाड्यातील अजितदादांचे सहा आमदार शरद पवारांच्या टार्गेटवर

Six MLAs of Ajitdad from Marathwada on Sharad Pawar's target

 

 

 

मराठवाड्यात राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षातील सहा विद्यमान आमदारांना उमेदवारी अर्ज दिल्यानंतर उदगीर, परळी, अहमदपूर, आष्टी, माजलगाव व वसमत मतदारसंघातील लढतीचे स्वरुप आता स्पष्ट होऊ लागले आहे.

 

परळीतून धनंजय मुंडे, आष्टी- बाळासाहेब आसबे, वसमतमधून- राजू नवघरे, मंत्री- संजय बनसोडे, अहमदपूर- बाबासाहेब पाटील, माजलगावमधून प्रकाश साेळंके यांना उमेदवारी देण्यात आली.

 

सहा मतदारसंघात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार ) पक्षाचेच उमेदवार रिंगणात असतील अशी व्यूहरचना केली जात आहे. या सहा मतदारसंघात उमेदवारीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षात तशी चुरस नव्हती.

 

मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार कोण, याची उत्सुकता आहे. वसमतमधून शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर इच्छूक असल्याने या मतदारसंघत गुरू- शिष्यामध्ये लढत होईल असे मानले जात आहे.

 

परळी येथून धनंजय मुंडे यांच्या विरोधातील उमदेवार कोण, याची उत्सुकता मराठवाड्यात सर्वत्र आहे. या मतदारसंघात शरद पवार कोणाच्या पाठिशी बळ उभे करतात,

 

यावर मतदारसंघाचे निकाल बदलतील, असा दावा केला जात आहे. मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात उदगीर मतदारसंघातून भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेलेले सुधाकर भालेराव यांनी उमेदवारी मागितली आहे.

 

अजित पवार यांनी बाळासाहेब आसबे यांना पुन्हा एकदा आष्टी मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी होईल अशी चिन्हे आहेत.

 

या मतदारसंघात कॉग्रेस अथवा शिवसेना ( उद्धव ठाकरे ) गटाचे नेते निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता कमी आहे. उदगीर, माजलगाव, अहमदपूर, वसमत, परळी,

 

या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बरोबरीने भाजपची ताकद होती. अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी भाजपाची मते हस्तांतरित होतात का, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

 

या मतदारसंघात जरांगे यांचे उमेदवारही निवडणुकीमध्ये उतरतील का, याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान बीड व घनसावंगी

 

मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासमोर भाजप व शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार उभे राहतील असे सांगण्यात येत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *