शिवसेना ठाकरे गटाकडून गंगाखेड विधानसभेची विशाल कदम यांना उमेदवारी
Vishal Kadam has been nominated for the Gangakhed Legislative Assembly by the Shiv Sena Thackeray group

पुर्णा /शेख तौफिक /9970443024
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून विशाल कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 करिता राज्यातील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे , गंगाखेड विधानसभा मतदारसंघ साठी विशाल कदम यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे
परभणी आणि गंगाखेड ची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तर पाचवीची जागा काँग्रेस पक्षाला आणि जिंतूर ची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्यात आली आहे
गंगाखेड विधानसभेची उमेदवारी सायंकाळी जाहीर झाल्यानंतर पूर्ण शहरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला ,शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,
महात्मा बसवेश्वर या महापुरुषांना अभिवादन करून फटाके फोडून उमेदवारीचे स्वागत केले यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते