मुख्यमंत्री शिंदेनी भाजपला सुनावले ;लोकसभेला सर्व्हेच्या नावे जागा सोडल्या, पण आता नाही

Chief Minister Shinde told the BJP; Lok Sabha seats were left for survey, but not now

 

 

 

महायुतीची आज दिल्लीत बैठक होतेय. या बैठकीत फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता आहे. महायुतीने आत्तापर्यंत 182 जागा जाहीर केल्या तरी दिल्लीत बैठक का असा सवाल उपस्थित केला जातोय.

 

लोकसभेप्रमाणेच यावेळीही भाजपचा अधिक जागांचा अट्टाहास आहे अशी माहिती एबीपी माझाला समजतेय. तर दुसरीकडे लोकसभेचा स्ट्राईक रेट,

 

मुख्यमंत्री शिंदेंची वाढलेली लोकप्रियता यामुळे शिवसेनेला अधिक जागा मिळाव्या अशी शिवसेनेची मागणी आहे. अखेरच्या तीस जागांसाठी महायुतीची अजूनही रस्सीखेच सुरू आहे.

 

लोकसभेला मुख्यमंत्र्यांनी सर्व्हेचं कारण ऐकून काही जागा सोडल्या, काही जागांचे उमेदवार बदलले, थोडी मवाळ भूमिका घेतली. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांची थोडी ठाम भूमिका असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती आहे.

 

 

लोकसभेप्रमाणेच यावेळी ही भाजपचा जास्त जागांचा अट्टाहास असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर लोकसभेच्या स्ट्राईक रेटवर,

 

तसेच लोकसभेनंतर मुख्यमंत्र्यांच्या वाढलेल्या लोकप्रियतेच्या दृष्टीने काही जागा जास्त मिळाव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे.

 

त्यामुळे शेवटच्या 30 जागांसाठी सुरू रस्सीखेच सुरू आहे. भाजपने जाहीर केलेल्या काही उमेदवारांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असून

 

शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याने जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे उर्वरित जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी शिंदे,

 

फडणवीस व पवार हे पुन्हा भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. जागावाटपात अपेक्षेनुसार जागा मिळत नसल्याने अजित पवार हे देखील दिल्लीला रवाना झाले. जागावाटपात तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

 

लोकसभेला मुख्यमंत्र्यांनी (शिवसेना) सर्व्हेचे कारण ऐकून काही जागा सोडल्या. तर काही जागांचे उमेदवार बदलले, थोडी मवाळ भूमिका घेतली.

 

मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांची थोडी ताठर भूमिका असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. लोकसभेला जास्त जागा घेऊन भाजपला जास्त नुकसान झाले होते.

 

तीच भूमिका विधानसभेला देखील घेतली तर नुकसान होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गेल्या अडीच वर्षातील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा,

 

त्यांनी केलेलं काम, सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्याची ताकद यावरून विधानसभेला शिवसेनेला जास्त जागा जिंकून येण्याचा विश्वास आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *