आज परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सात उमेदवारी अर्ज दाखल
Today, seven nomination papers were filed in four assembly constituencies of Parbhani district

आज शुक्रवार, दि 25 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे-
95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 12 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले. तर खंडेराव किसनराव आघाव (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आजपर्यंत 50 उमेदवारांना 90 नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आणि एकूण 11 उमेदवारांनी 13 नामनिर्देशन पत्र सादर केले.
96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 7 उमेदवारांनी 9 अर्ज घेतले. तर सुरेश लक्ष्मणराव बनसोडे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आजपर्यंत एकूण 64 उमेदवारांना एकूण 107 नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आणि एकूण 4 उमेदवारांनी एकूण 5 नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ – 9 उमेदवारांनी 13 अर्ज घेतले. तर आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. आजपर्यंत एकूण 56 उमेदवारांनी 88 अर्ज घेतले. आजपर्यंत 2 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
98- पाथरी विधानसभा मतदारसंघ – 12 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले. तर शे. मुश्ताक रज्जाक (अपक्ष) यांनी 2 अर्ज, मोहन जनार्धन कुलकर्णी (अपक्ष), त्रिंबक देविदास पवार (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी),
शिवाजी देवजी कांबळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत 10 उमेदवारांनी 12 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत