महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास मोदी सरकार पडणार,मोठ्या नेत्याचे भाकीत
If there is a change of power in Maharashtra, the Modi government will fall, predicts the great leader
जनतेचा निर्धार पाहता विदर्भातून प्रचंड मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला मतं मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. हरियाणात सत्तांतर होणार आहेच, महाराष्ट्रातही जर सत्तांतर झालं, तर
केंद्रातील एनडीए सरकार फार काळ टिकणार नाही. कारण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तेतून बाहेर पडतील,
असं लॉजिक मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची डळमळीत झाली आहे, असं भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला, यावेळी पृथ्वीबाबा बोलत होते.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तेतून बाहेर पडतील. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ महिन्यांच्या सरकारची पुनरावृत्ती होईल.
बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, संविधान बचाव यासारखे अनेक मुद्दे केंद्र सरकार किंवा राज्यातील तिघाडी सरकारला सोडवता आलेले नाहीत.
म्हणूनच महाराष्ट्रातल्या तीन तिघाडा काम बिघाडा सरकारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालाय, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपचा दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली, त्याबद्दल गोंदियावासियांचे आभार,
आगामी विधानसभा निवडणुकीतही नेत्रदीपक कामगिरी होईल, याबद्दल मला शंका नाही. भंडारा-गोंदिया परिसरात नानाभाऊंचं काम हलकं झालं आहे.
त्यामुळे ते आता राज्यभरात फिरू शकतात आणि या दोन्ही जिल्ह्यात गोपालदास अग्रवाल हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकून आणण्याची जबाबदारी घेऊ शकतात, असं चव्हाण म्हणाले.
मी मुख्यमंत्री असताना अग्रवालांसोबत काम केलं आहे. २४ तास गोंदिया मतदारसंघाचा विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. मग विधिमंडळाचं भाषण असो,
किंवा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत मंत्र्यांकडून कामे करुन घेण्याची चिकाटी असो, असंही पृथ्वीराज चव्हाण सांगत होते.
येत्या काळात अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. रोज एक नवीन पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. लोकसभेला जनतेने
महाविकास आघाडीला ६५ टक्के जागा दिल्या. ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. विधानसभेला महायुतीला २८८ पैकी १०० जागाही मिळणार नाहीत.