भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मित्रपक्षांना स्थान नाही

Allies have no place in the list of star campaigners announced by the BJP

 

 

 

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागांचा घोळ जवळपास संपण्यात जमा आहे. ऐन दिवाळीत निवडणूक लागल्याने शा‍ब्दिक बॉम्ब, फटक्यांची लड लागणार आहे.

 

आरोपांच्या फुलझड्या फेटणार आहेत. तर टीकेचे रॉकेट सुटणार आहे. अनेक नेते शब्द बंबाळ होणार आहेत. अनेकांना या फटक्यांचे चटके सहन करावे लागणार आहे.

 

आरोप-प्रत्यारोपांच्या टिकल्याच नाहीत तर सुतळी बॉम्ब राज्यातील जनतेचे मनोरंजन करणार आहे. यंदा दिवाळीत टीव्हीवरील रंगारंग कार्यक्रमापेक्षा सभांमधील शा‍ब्दिक हल्ले अधिक भाव खाऊन जातील.

 

त्यामुळेच अनेक पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने त्यांच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांचा समावेश आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 40 जणांची मोठी टीम प्रचाराची धूरा सांभाळणार आहेत. पण या यादीत जीवाभावाचे मित्र आणि लाडके कवींचे नाव न दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

गेल्या लोकसभेत भाजपाने अबकी बार 400 पारचा नारा दिला होता. पण विधानसभेसाठी अद्याप भाजपने कोणताही नारा रेटला नाही. प्रचाराला अजून सुरूवात झालेली नाही.

 

प्रचाराचा नारळ फुटल्यावर लागलीच मुद्दे आणि नारे जनतेच्या पुढ्यात येतील. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. कोण कोण आहेत या स्टार प्रचारक यादीत?

 

केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे

1) नरेंद्र मोदी

2) जे.पी. नड्डा

 

 

3) राजनाथ सिंह

4) अमित शाह

 

5) नितीन गडकरी

6) योगी आदित्यनाथ

 

7) डॉ. प्रमोद सावंत

8) भुपेंद्र पटेल

 

9) विष्णू देव साई

10) डॉ. मोहन यादव

 

11) भजनलाल शर्मा

12) नायब सिंग साईनी

 

13) हिमंता बिस्वा सर्मा

14) शिवराज सिंह चौहान

 

15) ज्योतिरादित्य सिंधिया

16) स्मृती इराणी

 

17) शिव प्रकाश

18) भूपेंद्र यादव

 

19) अश्विनी वैष्णव

20) पियुष गोयल

 

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?

1) देवेंद्र फडणवीस

2) विनोद तावडे

 

3) चंद्रशेखर बावनकुळे

4) रावसाहेब दानवे

 

5) अशोक चव्हाण

6) उदयनराजे भोसले

 

7) नारायण राणे

8) पंकजा मुंडे

 

9) चंद्रकांत दादा पाटील

10) आशिष शेलार

 

11) सुधीर मुनगंटीवार

12) राधाकृष्ण विखे पाटील

 

13) गिरीश महाजन

14) रविंद्र चव्हाण

 

15) प्रवीण दरेकर

16) अमर साबळे

 

17) मुरलीधर मोहळ

18) अशोक नेते

 

19) डॉ. संजय कुटे

20) नवनीत राणा

 

 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मित्र पक्षांच्या काही नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आघाडीवर होते.

 

तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव पण होते. अर्थात ती लोकसभेसाठीची रणधुमाळी होती. या यादीत रामदास आठवले यांचे नाव नसल्याने चर्चेला पेव फुटले आहेत.

 

त्यांनी महायुतीचा प्रचार करणार नसल्याची नाराजी अगोदरच बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत काही जागांसाठी ते आग्रही होते.

 

पण त्यांच्या पक्षाला जागा वाटपात स्थान देण्यात आले नाही. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात न आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *