शरद पवारांनी थेट ८६ उमेदवारांची झूम मिटिंग घेऊन ,मतमोजणीबाबत दिल्या महत्वाच्या सूचना

Sharad Pawar held a live Zoom meeting with 86 candidates and gave important instructions regarding the counting of votes.

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्याआधी सर्वच पक्षांनी अंतिम तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष

 

आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या सर्व उमेदवारांसोबत सकाळी चर्चा केली. झूम कॉलच्या माध्यमातून पवारांनी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

 

शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांना तातडीने मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शरद पवारांनी सकाळी त्यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्याशी झूम कॉलच्या माध्यमातून चर्चा केली. संभाव्य निकाल

 

अत्यंत चुरशीचे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पूर्ण निकाल हाती येत नाही, तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडण्यात येवू नये, असे पवारांनी सांगितले.

लोकसभेत काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मोजण्याचे राहिल्याच्या घटना घडल्या होत्या. हा दाखला देत पुरेशी काळजी घेत मतदान केंद्रावर उपस्थित राहण्यास पवारांनी सांगितले आहे.

 

विशेष म्हणजे विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास, २६ तारखेलाच शपथविधी करण्याचा प्रयत्न असेल, म्हणजे राष्ट्रपती राजवट लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

दरम्यान, शरद पवार हे धूर्त नेते आहेत, आमदारांच्या हितासाठी ते कुठलाही निर्णय घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी दिली.

 

तर शरद पवार काहीही करु शकतात, सगळ्यांच्याच मनात संभ्रमाचं वातावरण आहे, असं मत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं.

दुसरीकडे, महायुतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास भाजपनेही प्लॅन बी रेडी ठेवला आहे. महायुतीत नसलेल्या घटक पक्षांसोबत भाजपची बोलणी सुरु झाली आहे.

 

महायुती जर बहुमतापासून दूर राहिली, तर छोट्या घटकपक्षांची मोट बांधण्यात येणार असल्याचं बोललं जातं. महायुतीच्या नेत्यांची अपक्ष आणि छोट्या पक्षांसोबत बातचित सुरु आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *