KCR पाय घसरून पडले; रुग्णालयात दाखल

KCR fell off his feet; admitted to hospital ​

 

 

 

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव दुखापतग्रस्त झाले आहेत. पाय घसरून पडल्याने केसीआर यांच्या खुंब्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.

 

 

त्यांना तातडीने उपचारासाठी यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरूवारी रात्री केसीआर यांच्या एररावल्लीच्या फार्महाऊसवर ही घटना घडली.

 

 

केसीआर यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच बीआरएसच्या नेत्यांनी तसेच आमदारांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. केसीआर यांची प्रकृती स्थिर असून त्यांचा खुंबा फ्रॅक्चर झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

 

 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केसीआर यांना मोठा धक्का बसला होता. तेलंगणात १० वर्षांपासून बीआरएस पक्षाची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवत बीआरएसचा दारूण पराभव केला.

 

 

 

त्यानंतर राज्यात सरकार देखील स्थापन केलं. गुरुवारीच तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

 

 

 

तेलंगणामध्ये ११९ विधानसभा जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. ३ डिसेंबरला झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला. तर दोन वेळा सत्तेत राहिलेल्या बीआरएसला ३९ जागांवर समाधान मानावे लागले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *