महाविकास आघाडीतील जागावाटप फार्मुला बासनात;काँग्रेसचे आतापर्यंत १०१ उमेदवार जाहीर

Seat allotment formula in Mahavikas Aghadi is in Basanat; 101 candidates of Congress have been announced so far

 

 

 

मविआतील जागावाटपाचा घोळ अद्यापही संपलेला नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी ८५-८५-८५ चा फॉर्म्युला जाहीर केला होता.

 

त्यानुसार मविआताली प्रमुख तीन घटकपक्षांना समसमान जागा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब थोरातांनी ९०-९०-९० चा फॉर्म्युला जाहीर केला.

 

परंतु, काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेल्या यादीनुसार काँग्रेसने १०० उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे मविआतील समसमान फॉर्म्युल्याचं काय झालं? हा प्रश्न अधोरेखित होत आहे.

 

काँग्रेसने २४ ऑक्टोबर रोजी ४८ जणांची नावे जाहीर केली होती. तर, २६ ऑक्टोबरला २३ नावे जाहीर केली. त्यादिवशी रात्री १६ जणांना उमेदवारी देण्यात आली.

 

तर आज १४ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यांची बेरीज करता काँग्रेसने आतापर्यंत १०१ उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु, सचिन सावंत यांचं कालच्या यादीत नाव होतं,

 

त्यांचं नाव बदलून आजच्या यादीत अशोक जाधव यांचं नाव जाहीर कऱण्यात आलंय. त्यामुळे काँग्रेसचे एकूण १०० उमेदवार जाहीर झालेले आहेत.

 

 

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येऊन ठेपल्याने उमेदवार याद्या जाहीर केले जात आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे), मनसेने उमेदवार जाहीर केल्यानंतर

 

आता काँग्रेसनेही उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसच्या आताच्या यादीतून १४ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अंधेरी पश्चिममधून उमेदवार बदलण्यात आला आहे.

 

कालच्या यादीत सचिन सावंत यांना उमेदवारी दिली होती. परंतु, या जागेवरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज या जागेवरून अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

महाविकास आघाडीचा समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. परंतु, काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेल्या यादीनुसार काँग्रेसने शंभरी पार केली आहे. त्यामुळे मविआच्या समसमान जागा वाटपाचं काय झालं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *