निलंबित पोलीस अधिकारी करणार धनंजय मुंडेंबाबत नवा गौप्यस्फोट

Suspended police officer to make new revelation about Dhananjay Munde

 

 

 

 

निलंबित आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले स्वतः हून पोलिसांना शरण जाणार आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती आहे.

 

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती असा खळबळजनक गौप्यस्फोट कासले याने केला होता. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

 

याच दरम्यान बीडच्या शिवाजी नगर पोलिसांत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे कसले याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

हेच लक्षात घेता कासले याने एक पाऊल मागे घेत आता बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. मात्र तो पोलिसांना कधी शरण जाईल हे अद्याप त्याने स्पष्ट केले नाही.

 

व्हिडीओत रणजीत कासले सांगत आहे की, “मी कालपासून काही कमेंट वाचल्या. काही पत्रकार मित्र, वकील पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यावरुन मला जाणवलं की, पळून उपयोग होणार नाही.

 

कोणत्याही संकटाचा मी सामना केला आहे. त्यानुसार मी या संकटाचा सामना करणार आहे. मी बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. सिस्टीमविरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलं आहे.

 

माझे दोन्ही मोबाईल चालू करणार आहे. मला फोन करुन, त्रास देऊ नका. मला मेसेज करा. मी ज्यांच्यावर आरोप केले तेच भाजपात प्रवेश करणार आहे. धनंजय मुंडे आता वॉशिंग मशीनमध्ये क्लीन होऊन बाहेर येणार आहे.

 

यात फक्त माझा बळी जाणार हे माहिती आहे. त्यामुळे मी जे काही होईल त्याला सामोरं जाणार असून, बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे. त्यांनी मला पकडलं तरी काही हरकत नाही. हजर होऊन लढाई लढतच राहणार. सर्व आरोप सिद्ध करुन दाखवणार”.

 

रणजीत कासले हा बीड पोलिसांच्या सायबर विभागात पीएसआय म्हणून कार्यरत आहे. सूरत येथील एका व्यापाऱ्याने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकरणाचा तपास कासले याच्याकडे होता.

 

तपासादरम्यान त्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत बीडच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला 26 मार्च रोजी निलंबित केलं. सध्या तो निलंबित असून त्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे.

 

आपल्याला वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची सुपारी दिली होती असा व्हिडिओ करून कासले याने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केला आहे. या व्हिडिओने मोठी खळबळ माजली आहे. कासले याने यापूर्वी अनेक वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केले आहेत.

 

बीडच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यातही रणजीत कासलेविरोधात गुन्हा दाखल आहे. फिर्यादी भगवान कांडेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

 

लातूर मतदार संघात कुत्रा देखील निवडून येईल, असं अनुसूचित जमातीबद्दल वक्तव्य केल्याने तक्रार दाखल आहे. Instagram वर व्हिडिओ केल्याने सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *