काँग्रेसची चौथी यादी जाहीर

Fourth list of Congress announced

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने चौथी यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या या चौथ्या यादीत ४ उमेदवारांचा समावेश आहे.

 

यात अकोला पश्चिम, कुलाबा, सोलापूर शहर मध्य आणि कोल्हापूर उत्तर या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार आधीच जाहीर करण्यात आला होता.

 

मात्र त्याला विरोध झाल्याने उमेदवार बदलण्यात आला. आज जाहीर झालेल्या यादीनंतर काँग्रेसच्या एकूण उमेदवारांची संख्या १०३ झाली आहे.

 

राज्यात महायुतीमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस या दोन पक्षांनीच १००हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत.

 

काँग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवार
अकोला पश्चिम-साजिद खान
कुलाबा-हिरा देवासी

 

सोलापूर शहर मध्य- चेतन नरोटे
कोल्हापूर उत्तर-मधुरिमाराजे छत्रपती

 

काँग्रेसकडून अकोला पश्चिममधून साजिद खान मन्नान खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ मागील ३० वर्षापासून आमदार गोवर्धन शर्मा यांच्या ताब्यात होता.

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून उमेदवार फायनल करण्याची घाई सुरू आहे.

 

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरून मोठा वाद झाल्याचे पहायला मिळाले होते. आता काँग्रेस अजून किती उमेदवार जाहीर करते हे पहावे लागले.

 

 

Image

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *