खासदारावर ‘इन्कम टॅक्स’ची धाड; सापडली 200 कोटींची कॅश;पहा VIDEO

'Income Tax' attack on MP; 200 crore cash found; see VIDEO

 

 

 

 

काँग्रेसचे खासदाराच्या विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागानं शुक्रवारी छापेमारी केली. या छाप्यांमध्ये मोठं घबाड हाती लागलं आहे.

 

 

तब्बल २०० कोटी रुपयांची कॅश या ठिकाणांवर आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. झारखंड आणि ओडिशातील कंपन्यांवर ही छापेमारी करण्यात आली आहे.

 

 

एएनआयच्या माहितीनुसार, बलदेव साहू इन्फ्रा प्रा. लि.च्या बौद्ध डिस्टिलरीज या कंपनीच्या झारखंड आणि ओडिशा इथल्या प्लान्टवर इन्कम टॅक्स विभागानं ही छापेमारी केली आहे. काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीची ही कंपनी आहे.

 

 

 

दरम्यान, या ठिकाणांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या कॅशची अद्याप मोजदाद सुरु आहे, त्यामुळं या रक्कमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दैनिक भास्करच्या पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीचा फोटो शेअर करत पंतप्रधानांनी म्हटलं की,

 

 

देशवासियांनो या नोटांचा ढीग पाहा आणि या लोकांच्या इमानदारीची भाषणं ऐका. जनतेकडून जे लुटलं आहे, त्यातील एक-एक रुपया परत द्यावा लागेल. ही मोदींची गॅरंटी आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *