धनंजय मुंडे यांना पाच मुलं ;शपथपत्रात उल्लेख

Five children to Dhananjay Munde; mentioned in affidavit

 

 

मंत्री धनंजय मुंडे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा परळी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांचा सामना असणार आहे.

 

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रात 5 अपत्यांचा उल्लेख केला आहे.

 

धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात पाच आपत्यांचा उल्लेख केला आहे. पहिल्यांदाच निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी शिवानी मुंडे आणि सीशिव मुंडे या दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे.

 

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र दिले होते त्यात या दोन अपत्यांचा उल्लेख नव्हता. कारण ते त्यांच्यावर अवलंबून नव्हते असं

 

या शपथ पत्रावरून लक्षात येत आहे. शपथपत्रामध्ये शपथ पत्र देणाऱ्या व्यक्तींवरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचाच उल्लेख केला जातो. म्हणून आता शिवानी मुंडे आणि सिशिव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.

 

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी वैष्णवी धनंजय मुंडे तसेच जानवी धनंजय मुंडे आदीश्री धनंजय मुंडे या तीन अपत्यांचाच उल्लेख होता.

 

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शपथपत्रात मात्र एकूण पाच अपत्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

 

धनंजय मुंडे यांनी उल्लेख केलेल्या अपत्यांची नावे
1. शिवानी मुंडे
2. सीशिव मुंडे
3. वैष्णवी मुंडे
4. जानवी मुंडे
5. आदीश्री मुंडे

 

गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. मात्र, त्यावेळी धनंजय मुंडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते.

 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजे साहेब देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची उमेदवारी परळीतून जाहीर केली.

 

त्यामुळे परळीत धनंजय मुंडे विरुद्ध राजसाहेब देशमुख असा होणार सामना रंगणार आहे. शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मराठा कार्ड वापरल्याची जोरदार चर्चा आहे

 

. याशिवाय धनंजय मुंडे यांच्याविरोधात मतदारसंघात ताकद असलेल्या काही नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *