भाजपतर्फे विधानपरिषदेच्या तीन जागांवर उमेदवार जाहीर

BJP announced candidates for three Legislative Council seats

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांचा घाट घालण्यात आला आहे.

 

 

 

 

यासाठी २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीकरता कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

 

 

 

 

 

भाजपाने कोकण विभाग पदवीधरसाठी निरंजन वाडखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण रविंद्र शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ हिरामन दराडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 

 

 

 

विधानपरिषदेच्या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ,

 

 

 

 

 

तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे,

 

 

 

 

नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *