राज ठाकरे पुत्राच्या विरोधात का दिला उमेदवार ?प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
Why did Raj Thackeray give a candidate against his son? Chief Minister Shinde said to the question

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मतदानासाठी अवघे 20 दिवस उरले आहेत. राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांची यादी जाहिर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील माहिम मतदारसंघ चर्चेत आहे. माहिम मतदारसंघातून पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
तर, अमित ठाकरेंविरोधात शिंदेंच्या सेनेचे सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. माहिमच्या जागेचा तिढा सुटणार कसा असा प्रश्न असताचाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
माहिम विधानसभेची निवडणूक अटी-तटीची ठरणार आहे. लोकसभेत राज ठाकरेंच्या मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे.
त्यामुळं राज्यात एकच चर्चा आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड महायुती करणार अशी चर्चा होती. मात्र सदा सरवणकर निवडणुक लढवण्यावर ठाम असल्याने महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांना माहिम मतदारसंघाबाबतही वक्तव्य केलं आहे.
आम्हाला विश्वासात न घेता मनसेकडून माहीमचा उमेदवार जाहीर करण्यात आला, असं शिंदेंनी म्हटलं आहे. आमची राज ठाकरेंसोबत विधानसभेच्या जागांबाबत बोलणी सुरू होती.
असं असतांना त्यांनी उमेदवार जाहीर केलाय. माहीममध्ये आमचा विद्यमान आमदार आहे. कार्यकर्त्यांची माहीममधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होऊ नये यासाठीही नेत्याला प्रयत्न करावे लागतात, असं शिंदेंनी म्हटलं आहे. त्यामुळं आता माहिमचा तिढा कसा सुटणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
माहिम येथे सलग दोन ते तीन टर्म शिवसेनेचा आमदार आहे. त्यांचे कार्यकर्तेदेखील निवडणूक लढण्यास उत्सूक आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल तुटू न देणे हेदेखील नेत्याचे काम आहे.
आता आमची महायुती आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार आम्ही एकत्र आहोत. आम्ही महायुतीकडून निवडणुक लढवणार आहोत.
रामदास आठवलेंचा पक्ष आणि जन सुराज्य पक्षदेखील आमच्यासोबत आहे. बहुमत आम्हाला मिळेल, असंही शिंदे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने त्यांना एबी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
मात्र, मलिकांच्या उमेदवारीला महायुतीतील इतर दोन पक्षांचा विरोध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नवाब मलिकांच्या उमेदवारीवरुन भूमिका स्पष्ट घेतली आहे.
आमची भूमिका आधीपासून तिच आहे आणि तीच राहणार आहे. आम्ही तिथे उमेदवारदेखील दिला आहे. बाळासाहेब ठाकरे
व आनंद दिघेंची विचारधारा आम्ही मानतो. आमची भूमिका तिच आहे. चार तारखेला सगळं पिक्चर क्लिअर होईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.