फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला पितापुत्रासोबत मोदी-शाहांच्या रात्री गुप्तभेटी ?

Farooq Abdullah, Umar Abdullah secret meeting with father and son on the night of Modi-Shah?

 

 

 

 

 

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

 

 

आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांची गुप्तभेट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या भेटींची माहिती बाहेर येऊ नये म्हणून रात्री या भेटी होत असल्याचा दावाही आझाद यांनी केला आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे.

 

 

 

तसेच ते पुन्हा एनडीएसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या पाश्वभूमीवर आझाद यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 

 

काँग्रेसमधून बाहेर पडत आझाद यांनी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीची स्थापना केली आहे. त्यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल्ला पितापुत्र व मोदी-शाहांच्या भेटीबाबत दावा केला आहे.

 

 

 

अब्दुल्ला हे नेहमी दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका करत आझाद म्हणाले, अब्दुल्ला हे श्रीनगरमध्ये एक सांगतात तर जम्मूत दुसरे. दिल्लीत काहीतरी वेगळेच बोलतात.

 

 

 

अब्दुलांच्या नॅशनल कॉन्फरन्सने 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपशी आघाडी करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.

 

 

 

अब्दुल्ला पितापुत्र डबल गेम खेळतात, असा आरोपही आझाद यांनी केला. दोघेही सरकार आणि विरोधकांना खूष करण्याचा प्रयत्न करतात, असेही आझाद म्हणाले.

 

 

 

अब्दुल्ला आणि पंतप्रधान मोदींची 3 ऑगस्ट 2019 रोजी भेट झाल्याचा दावा करत आझाद म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवण्याआधी त्यांची भेट झाली होती.

 

 

 

त्यावेळी दिल्लीत अशी चर्चा होती की, या निर्णयाबाबत अब्दुल्लांना विश्वासात घेतले होते. तसेच नेत्यांना घरात बंदी करून ठेवण्याबाबतही सुचवल्याचा दावा आझाद यांनी केला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *