पत्रकार परिषद सुरु असतांना स्टेजवरच काँग्रेस नेत्याचा मृत्यू ;पाहा VIDEO

Congress leader dies on stage during press conference; see VIDEO

 

 

 

 

पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक काँग्रेस नेता स्टेजवरच कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नेता मंचावर कोसळल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून चटकन अंगावर काटा येतो.

 

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bangalore) एका काँग्रेस नेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

 

बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र यांना प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान अचानक कोसळले. त्यांना

 

हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

 

बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माईकवर बोलत असताना काँग्रेस नेते रवींद्र अचानक खुर्चीवरून खाली पडले. कोणाला काही कळण्यापूर्वीच रवींद्र कोसळले

 

आणि बेशुद्ध झाले. त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तोपर्यंत फारच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

 

 

बंगळुरुमधील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्यावेळी पत्रकार परिषद सुरू होती, त्यावेळी खुर्चीवर बसून रवींद्र माईकवरुन संबोधित करत होते.

 

त्याचवेळी त्यांना अचनाक झटका लागल्यासारखं झालं. त्यानंतर त्यांचे पाय अचनाक गळून पडले आणि ते थेट खाली कोसळले. नेमकं काय घडलं? कुणाला काहीच कळालं नाही.

 

दरम्यान, अवघे काही सेकंद गेल्यानंतर एकच गोंधळ उडाला. सर्वजण त्यांच्याजवळ पोहोचले आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं.

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी कडून पर्यायी जागा वाटप करताना

 

अनियमितता केल्याच्या आरोपावरून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली होती.

 

 

आता राज्यपालांच्या या आदेशाला आव्हान देत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 17A अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात

 

चौकशीला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. यामुळे तपास यंत्रणेला सिद्धरामय्यांविरुद्ध तपास करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आता उच्च न्यायालय याप्रकरणी काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *