मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर संतापले,म्हणाले “खोडा घालाल तर कोल्हापुरी जोडा दाखवू”

Chief Minister Shinde was furious with the opposition, saying, "If you wear Khoda, we will show you Kolhapuri Joda".

 

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी शिंदे सरकारला घेरायला सुरूवात केली आहे. पण लाडकी बहिण योजनेत खोडा घालणाऱ्यांना कोल्हापूरी जोडा

 

दाखवल्याशिवाय थांबू नका, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरीकांना केले आहे. साताऱ्याच्या कोरेगावमधील एका सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

 

साताऱ्यात कोरेगावचे महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचाराच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलते होते. यावेळी त्यांनी लाडकी बहिणसह अनेक मुद्द्यावरून विऱोधकांवर हल्ला चढवला होता.

 

कोविडच्या काळात लपुन कसं चालायचंय. पण मी जे जे करायचं ते मी त्या काळात बाहेर पडून केलं, असा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंनी टोला लगावला.

 

शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर ठाकरेंनी जनतेच्या दरबारात जाण्याची भाषा केली होती. हाच धागा पकडून आता शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.

 

दोन अडिच वर्षांच महाविकास आघाडीचं कामं आणि दोन वर्षांच महायुतीचं काम, जावा जनतेच्या दरबारात आणि होऊन जाऊद्यात दुध का दुध आणि पाणी का पाणी, असे आव्हान शिंदेंनी ठाकरेंना दिले आहे.

 

मुख्यमंत्री शिंदेंनी लाडकी बहिणवरून देखील विरोधकांना घेरलं आहे. लाडक्या बहिणींच प्रेम मिळतय,त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय.

 

पण हे सरकार म्हणजे देना बँक लेना बँक नाही, असा टोला देखील शिंदेंनी ठाकरेंना लगावला आहे.तसेच कोणी मायकलाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करु शकणार नाही.

 

तरी जर योजनेत खोडा घातला, तर कोल्हापूरी जोडा दाखवल्या शिवाय थांबु नका, असे आवाहन शिंदेंनी जनतेला केले आहे.

 

त्याचसोबत २३ नोव्हेंबरला निकाल लागला की डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात टाकणार आहे.आणि लाडक्या बहिणींना १५०० रूपयांवर

 

न ठेवता त्यांचा निधी वाढवणार आहे. मला बहिणी लखपती झालेल्या बघायच्या आहेत, असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *