आता महिलांना मिळणार 3000 रुपये ; सोबतच आज मोठ्या घोषणा होणार
Now women will get 3000 rupees; Along with this, big announcements will be made today
महाविकास आघाडीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील बीकेसीत महाराष्ट्र स्वाभिमान सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी , पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडताना राहुल गांधी आज पाच गॅरंटींची घोषणा करणार आहेत. या गॅरंटीमध्ये आरोग्य, नोकर भरती, कर्ज माफी महिलांना आर्थिक मदत
या संदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट करणार असल्याचं बोललं जात आहे.
पुढील गॅरंटींची घोषणा होण्याची शक्यता-
1. 15 लाख रुपयांपर्यंत विमा कवच मिळणार
2. लाडक्या बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर 3 हजार रुपये महिलांना देण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता
3. महिलांना एसटीचा मोफत प्रवास
4. 3 लाखांपर्यंत सरसकट शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याची घोषणा
5. नोकरभरती संदर्भात कॅलेंडरप्रमाणे नियोजन करत सर्वाधिक नोकरभरती करणार
6. जातीनिहाय जणगणना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही मोठ्या घोषणा-
1) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये.
3) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
4) वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
6) राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
7) 45 हजार पांदण रस्ते बांधणार.
8) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
9) वीज बिलात 30 टक्के कपात.
10) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार.
महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षाच्या कालखंडात फक्त योजना आणि प्रकल्प बंद पाडण्याचे उद्योग केले. देंवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना बंद करून तिची चौकशी लावली,
मेट्रो बंद पाडली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले, समृद्धी महामार्गाच्या कामात अडथळे आणले. मात्र हे सर्व अडथळे दूर करून आम्ही सर्व लोकोपयोगी प्रकल्प सुरु करून ते पूर्ण केले.
अडीच वर्षात त्यांनी केवळ 4 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा दिल्या, तर आम्ही दोन वर्षात सिंचनाच्या 124 सुप्रमा दिल्या आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन वर्षात 350 कोटी देऊन सुमारे एक लाख नागरिकांचे प्राण वाचले असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.