फडणवीसांकडून लाल रंगाच्या संविधानावरुन टीका, राहुल गांधींचे प्रत्युत्तर
Fadnavis Criticizes Red Constitution, Rahul Gandhi's Reply
“राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाचे संविधान आहे. ते प्रत्येक सभांमधून लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत. त्यांच्या आजूबाजूला शहरी नक्षलवादी असतात.
ते कट्टर डाव्या विचारांकडे झुकलेले आहेत, याचेच हे निदर्शक आहे”, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राच्या माजी भाजप मुख्यमंत्र्यांच्या मते बाबासाहेबांचे संविधान दाखवून जात जनगणनेसाठी आवाज उठवणे ही नक्षलवादी संकल्पना आहे.
भाजपची ही विचारसरणी म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांचा अपमान असल्याचे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला. महाराष्ट्रातील जनता भाजपकडून झालेला बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही.
महाराष्ट्रातील जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत आपल्या संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील, असे सांगून जातनिहाय जनगणना होणार हे माझ्याकडून लिहून घ्या, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवादी तसेच अनेक डाव्या विचारांच्या कट्टर संघटना होत्या. या मंडळींच्या माध्यमातून राहुल गांधी देशात अराजक पसरवीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान म्हटले की निळ्या रंगाचे स्मरण होत असताना राहुल गांधी हे लाल रंगाचे पुस्तक हातात घेऊन काय सुचवित आहेत हे आता स्पष्ट होऊ लागलेले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.