शरद पवारांना मोठा धक्का;राष्ट्र्वादीत सामूहिक राजीनामे ;काय घडले कारण ?
Big blow to Sharad Pawar; mass resignations in the Nationalist Party; what happened because?

मोठी बातमी समोर येत आहे, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात फूट पडली आहे.
पक्षावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींकडून विश्वासात घेतलं जात नसल्यानं पादाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानं निवडणुकीत याचा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांकडून
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवण्याच्या घाट जयंत पाटील यांनी घातला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी जयंत पाटील पक्षाला संपवण्याचे काम करत आहेत. जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना ताकद देण्याचे काम करत आहे.
असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू असंही या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्यानं याचा मोठा फटका हा जिल्ह्यात
महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे आता या संदर्भात पक्ष काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला होता, हे प्रकरण चांगलंच गाजलं, याच प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.