विधानसभा निवडणुकीत बापासमोर मुलीचे आव्हान

Daughter's challenge to father in assembly elections

 

 

 

गडचिरोली जिल्ह्यातला अहेरी हा मतदारसंघ आत्राम राजघराण्याचा पारंपारिक मतदार संघ आहे. दक्षिण गडचिरोलीतल्या आदिवासी मतदारांवर प्रभाव असलेल्या या आत्राम राजघराण्यातील एक नवी लढत मतदारांना

 

आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बाप लेकीची राज्यातली ही पहिली लढत असल्याचे पहायला मिळत आहे.

 

घरातील फुटीमुळे राजकीय वातावरण तापले असताना पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील असा राजकीय संघर्ष पेटला आहे.

 

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जनसन्मान यात्रेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी

 

आणि जावयाविषयी केलेल्या विधानावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्या नंतर 12 सप्टेंबरला मंत्री आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम (हलगेकर ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला.

 

त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगी असा राजकीय संघर्ष उभा झाला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.

 

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्याच मोठ्या मुलीने आव्हान दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

 

लोकसभा निवडणुकीनंतर आत्राम राजघराण्यात राजकीय वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम लोकसभेकरिता इच्छुक होते. परंतु ऐनवेळेवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही.

 

यामुळे त्यांनी विधानसभेकडे लक्ष केंद्रीत केले. मात्र, त्यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम, जावई ऋतुराज हलगेकर हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने

 

घरातच सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. त्यामुळे आजपर्यंत धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली मोठे झालेले मुलगी आणि जावई आता त्यांनाच आव्हान देत आहेत.

 

दरम्यान, 6 सप्टेंबरच्या जनसन्मान यात्रेत भाषणादरम्यान मंत्री आत्राम यांनी मनातील खदखद जनतसमोर बोलून दाखविल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात याविषयी चर्चा सुरू झाली.

 

जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम सभापतीसह विविध राजकीय पद भूषवलेल्या भाग्यश्री आत्राम या मागील काही दिवसापासून शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या.

 

अनिल देशमुख यांनीदेखील याविषयी वेळोवेळी भाष्य केले होते. 12 सप्टेंबरला अहेरी येथे भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर आपल्या समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली होती

 

आणि अखेर जे नव्हतं व्हायचं ते झाल आणि अखेर भागेश्री आत्राम हलगेकर यांनी आपल्या वडिलांची साथ सोडली. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या उपस्थित शरद पवार गटात भाग्यश्री आत्राम यांनी प्रवेश केला.

 

त्यामुळे गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलीचा राजकीय संघर्ष पेटला असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

भाग्यश्री आत्राम यांनीं वडिलांच्या विरोधात बंड पुकारले असले तरी वडिलांनी मात्र ते आव्हान स्वीकारून गेलीं पन्नास वर्ष राजकीय जीवनात मतदार संघाच्या विकाससाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा

 

मतदारासमोर मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मतदारराजा नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकून विजयी मोहर लावतात हे येत्या काळात कळणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *