अंबानींच्या अलिशान लग्न सोहळ्यावर झालेल्या टीकेला नीता अंबानींचं प्रत्युत्तर

Nita Ambani's response to criticism of Ambani's lavish wedding

 

 

 

२०२४ मध्ये झालेल्या ग्रॅण्ड लग्नसोहळ्याची जगभर चर्चा झाली होती. देशातील अन् देशाबाहेरील प्रमुख पाहुणे, त्यांचं आदरातिथ्य, त्यांच्यासाठी केलेल्या सुविधा अन् त्यांना देण्यात आलेल्या भेटवस्तूंमुळे हा विवाहसोहळा देदीप्यमान ठरला.

 

अर्थात हा सोहळा काही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य घरातील सोहळा नव्हता. हा सोहळा होता प्रसिद्ध उद्योजग मुकेश अंबानी यांच्या लेकाचा. म्हणजेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा.

 

लग्नापूर्वीच्या विधींपासून लग्नसोहळ्याच्या सर्व विधी आणि कार्यक्रमाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे हा लग्नसोहळा देशासाठी चर्चेचा विषय बनला होता. याच चर्चांवर आता अनंत अंबानी यांच्या आई नीता अंबानी यांनी साजेसं उत्तर दिलंय.

 

अनंत अंबानीच्या दिमाखदार सोहळ्यात कोट्यवधींचा खर्च झाला. या खर्चाला काहीच मर्यादा नव्हती. त्यामुळे देशभरातून या लग्नसोहळ्यावर टीकाही झाली. याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांसाठी काहीतरी खास करायचं असतं.

 

आम्हीही तेच केलं. मला वाटतं हा एक मेड इन ब्रँड होता. यामुळे आपल्या भारतीय परंपरा, भारतीय वारसा आणि संस्कृती जगासमोर आली, असं मला वाटतं.” नीता अंबानी ब्लूमबर्ग टेलिव्हिजनशी बोलत होत्या.

 

राधिकासोबत अनंतला पाहून मला खूप अभिमान वाटला, असंही नीता अंबानी म्हणाल्या. “माझा मुलगा अनंत लहानपणापासूनच त्याच्या दम्यामुळे लठ्ठपणाशी झुंज देत आहे.

 

असं असतानाही तो एका आत्मविश्वासू वराच्या रूपात स्टेजवर गेला होता. आणि मी त्याला त्याच्या जीवनसाथीचा हात धरताना पाहिले, मला वाटते की हीच सर्वात हृदयस्पर्शी भावना होती”, असंही नीता अंबानी म्हणाल्या.

 

अनंत अंबानींच्या लग्नविधीला मार्च २०२४ पासून सुरुवात झाली. जामनगर येथे तीन दिवस मोठा दिमाखदार सोहळा पार पडला. यानंतर जून महिन्यात युरोप येथे क्रूजवर मोठं सेलीब्रेशन करण्यात आलं. तर, मुंबईत जुलै महिन्यात तीन दिवसांचा हा मोठा सोहळा पार पडला.

 

जामनगर येथील लग्नपूर्वी कार्यक्रमात पॉप सिंगर रिहानाने कला सादर केली होती. तिने याआधी मोठा ब्रेक घेतला होता. तसंच, या हाय प्रोफाईल लग्नात जस्टिन बीबर,

 

दिलजीत दोसांझ यांनीही लाईव्ह कला सादर केली. तर शाहरूख खान, सलमान खान आणि अमिर खान अशा कलारांनाही येथे खास आमंत्रण देण्यात आलं होतं.

 

जुलैमध्ये झालेल्या सोहळ्यात किम कार्दार्शियन हिनेही हजेरी लावली होती. तंच, मार्क जुकरबर्ग, इवांका ट्रम्प, डेविड बेकहम आदी मान्यवर पाहुणे हजर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितिमुळेही हा सोहळा केंद्रस्थानी राहिला होता.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *