महायुतीचं जागावाटपाबाबत शिंदे सरकारमधील मंत्र्याचं विधान चर्चेत

The statement of the minister in the Shinde government regarding the seat allocation of the Grand Alliance is in discussion

 

 

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आला आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.

 

आमचं महायुतीचं जागावाटप झालं आहे. आमच्या तीनही नेत्यांनी अतिशय प्रेमाच्या वातावरणात जागावाटप झाला आहे. बाहेर गैरसमज पसरवला जात आहे.

 

कारण महाविकास आघाडीत जी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांना वाटतं यांच्यातही तेच आहे, असं पसरवलं जात आहे.

 

मात्र आमच्यामध्ये अतिशय प्रेमाने जागावाटप झालं आहे. किती जागा लढवायच्या हा अधिकार आमचे प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांचा आहे. ते आमचं जागावाटप जाहीर करतील, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 

अतिशय चांगल्या वातावरणात हे जागावाटप झालं आहे. दोन-तीन जागा संदर्भात जो तिढा आहे. तो अमितभाई शाहांनी सांगितलं की एका सेकंदात सुटणार आहे.

 

ही जागा तुमची हे सांगण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळात हे सुटणार आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

 

अमित शाह यांचं या निवडणुकीकडे लक्ष आहे. आमची लढाई महाविकास आघाडीची आहे. त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केलं जाईल. उत्तर प्रदेशमध्ये अमित भाईंनी मायक्रो प्लॅनिंग केलं होतं.

 

मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तशा प्रकारच्या प्लॅनिंग केलं होतं. मायक्रो प्लॅनिंग हे त्यांचं बुथवर असतं. सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचं त्यांचा प्लॅनिंग केलं जातं. बुथच्या शक्तीचा विचार केला जातो, असं मुनगंटीवार म्हणाले.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भावर भाजपचा भर आहे.

 

अमित शाह आज विदर्भातील 62 जागांवरील तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

अमित शाह आले की कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होतं. त्यांची मांडणी ही अतिशय तर्कसंगत असते. त्या दृष्टीने विदर्भातील सर्व जिल्ह्यातील साधारणता मंडल

 

आणि मंडल स्तरावरती प्रमुख नेते यांना एकत्रित केला आहे. त्यानंतर विदर्भातील प्रमुख नेत्यांची व्यक्तिगत संवादही ते करणार आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *