अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख जो बायडेन आपल्या भलत्याच कृतीमुळे होतायेत जगभरात ;ट्रोल ;पाहा VIDEO

The President of the United States, Joe Biden, is getting worldwide attention because of his wrong actions; troll; see VIDEO

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 परिषदेच्या निमित्ताने इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या विविध देशांच्या प्रमुखांशी भेटीगाठी होत आहेत.

 

 

 

या ठिकाणी जी ७ समूहातील सर्व राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित आहेत. एकीकडे सहभागी राष्ट्रांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत गंभीर चर्चा होत असताना दुसरीकडे काही विनोदी प्रसंगही घडताना दिसत आहेत.

 

 

 

जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे सर्वाधिकार हाती असलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याही बाबतीत असाच एक प्रसंग घडला असून त्यामुळे त्यांच्यावर मिश्किल टिप्पणीसह टीकाही केली जात आहे.

 

 

 

जो बायडेन जी-७ परिषदेसाठी इटलीमध्ये दाखल झाले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने गुरुवारी अर्थात १३ जून रोजी इतर राष्ट्रप्रमुखांसंह परिषदेच्या ठिकाणी बाहेर मोकळ्या जागेत फोटोसेशन चालू होतं.

 

 

 

यावेळी इतर सर्व राष्ट्रप्रमुख फोटोसाठी एकत्र उभे असताना नेमके त्याचवेळी जो बायडेन मात्र भलतीकडेच पाहात होते. एवढंच नाही तर ते उभ्या असलेल्या जागेवरून डावीकडे वळून काही अंतर चालतही गेले. नंतर त्या बाजूला तोंड करून ते उभे राहिले.

 

 

 

जो बायडेन तिकडे तोंड करून उभे असताना इकडे इतर राष्ट्रप्रमुख त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहात होते. त्यात यजमान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी,

 

 

 

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चॅन्सेलर ओलफ शोल्झ, युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन अशा दिग्गज नेत्यांचा समावेश होता!

 

 

 

दरम्यान, फोटोसेशन व व्हिडीओ शूटकडे जो बायडेन यांचं लक्षच नसल्याचं पाहून शेवटी यजमान जॉर्जिया मेलोनी यांनीच पुढे जाऊन जो बायडेन यांना फोटोसेशनची जाणीव करून दिली. त्यानंतरही बायडेन काही पावलंच पुढे सरकले. शेवटी बाजूला उभे असलेले इतर नेते त्यांच्याकडे चालत गेले व त्यांच्या अवती-भवती फोटोसाठी उभे राहिले.

 

 

 

 

 

एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी जो बायडेन यांनी हातातला काळा गॉगल ऐटीत डोळ्यांवर चढवला. सगळे नेते त्यांच्या आजूबाजूला उभे राहिले आणि पुढचं फोटोसेशन पार पडलं.

 

 

 

 

या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर जशा मिश्किल प्रतिक्रिया येत आहेत, तशाच टीकात्मक पोस्टही दिसत आहेत.

 

 

 

 

तर एका अमेरिकन महिला लेखिकेने “हे ईश्वरा, अमेरिकेला मदत कर. आम्ही अवघड परिस्थितीत आहोत. अजून किती काळ हे या व्यक्तीला आम्हाला खजील करू देणार आहेत?” असा प्रश्न केला आहे.

 

 

 

अशाच प्रकारचे जो बायडेन यांचे आणखीही काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या इटली दौऱ्यातील महत्त्वाच्या विधानांबरोबरच त्यांच्याबाबतीत घडलेले हे प्रसंगही चर्चेचा विषय ठरले आहेत.

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *