शिंदेसेनेच्या नेत्याकडून थेट अजित पवारांना जीवे मारण्याची धमकी,पोलिसांनी केली अटक
Shinde Sena leader directly threatens to kill Ajit Pawar, arrested by police

नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचा कामावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच विकोपाला गेला आहे.
या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या अजित पवारांना पेट्रोल टाकून जाळा अशा प्रकारची भाषा शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याने वापरल्याने अहवाल आणखीनच तापला आहे.
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपासून शिंदे यांची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी हा संघर्ष निर्माण झाला आहे.
यातच देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे आणि शिंदे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यात भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून श्रेयवाद निर्माण झाला.
शिंदेसेना-राष्ट्रवादी यांच्याातील श्रेयवाद इतका टोकाला गेला आहे की दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांना भगूरमध्ये आल्यानंतर पेट्रोल टाकून जाळा
अशा प्रकारचे मेसेज शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले. या सगळ्या मेसेजमुळे पोलिसांनी ४५ वर्षीय संतोष फोकणे नामक संशयिताला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे अजित पवारांबद्दल अशा प्रकारे त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहे यांनी केली आहे.
देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर खदखद बोलून दाखवली. मतदारसंघातील विकासकामांमध्ये महायुतीतल्या मित्रपक्षातील नेत्यांकडून अडथळे निर्माण त्रास दिला जात असल्याची तक्रार आमदार सरोज आहिरे यांनी केली.
मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा.
भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असं मला सांगितलं जातं, असे सांगत महायुतीच्या अर्थात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांच्याकडे जाहीररित्या केली.