अचानक मायावतींच्या घरात घुसले NSG कमांडो, सायरन वाजवत रुग्णवाहिका, नेमकं काय घडलं?
Suddenly NSG commandos entered Mayawati's house, ambulances blaring sirens, what exactly happened?

सध्या बहुजन समाज पार्टीमध्ये (बसपा) अंतर्गत कलह सुरु आहे. जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या घरी एक वेगळीच धावपळ दिसून आली.
मोठा सुरक्षा बंदोबस्त असलेल्या या घरामध्ये अचानक एकापाठोपाठ एक NSG कमांडो दणादण करुन घरात घुसले. मायावती या घरात राहतात. जोरात सायरन वाजत रुग्णवाहिका घराच्या आवारात शिरली.
यावेळी यूपी पोलिसांच पथक घराच्या आत आणि बाहेर हजर होतं. मेडिकल टीमही सोबत होती. सगळ्यांच्या नजरा घराच्या गेटवर लागल्या होत्या. सर्वांना हेच जाणून घ्यायच होतं की, अचानक असं काय घडलं की, मायावतीच्या घरात एनएसजी कमांडो घुसले. जाणून घेऊ हे सर्व प्रकरण काय आहे.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना एनएसजी सुरक्षा आहे. मायावती यांच्या घरातल्या सुरक्षा स्थितीचा आणि सुरक्षा पथकाच्या तत्परतेचा आढावा घेण्यासाठी NSG कमांडोजनी मॉकड्रील केली.
9 माल एवेन्यू येथील माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या निवासस्थानी ही मॉकड्रील पार पडली. सुरक्षारक्षक, ड्रायव्हर आणि NSG या मॉकड्रीलमध्ये सहभागी होते. स्थानिक पोलीस, फायर विभाग आणि मेडीकल टीम आपल्या रुग्णावाहिकेसह त्यावेळी तिथे हजर होते.
रुग्णवाहिकेसह तमाम एनएसजी कमांडो मायावती यांच्या घरात घुसले, त्यावेळी इथे मोठा सुरक्षा बंदोबस्त होता. संकटाची स्थिती ओढवली, तर त्याचा कसा सामना करायचा, याचा आढावा घेण्यात आला.
नॅशनल सिक्योरिटी गार्ड म्हणजे NSG. एनएसजी कमांडोजचा जगातील बेस्ट कमांडोजमध्ये समावेश होतो. थोड्यावेळाने एनएसजी कमांडो आणि अधिकारी मायावती यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना दिसले. मायावती यांच्या घरी ही ड्रील करण्यात आली.
उत्तर प्रदेशात काही ठराविक लोकांना एनएसजीच सुरक्षा कवच मिळालेलं आहे. त्यात उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिसऱ्या मायावती आहेत.
मायावती यांच्या निवासस्थानी त्यांच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडो नेहमीच तैनात असतात. आपातकालीन स्थितीचा कसा सामना करायचा, त्याची तपासणी करण्यासाठी NSG कडून ही मॉकड्रील करण्यात आली.