अमित शहांच्या “या” राजकीय प्लॅन ने शिंद-पवारांना फुटला घाम !
Amit Shah's political plan made Shind-Pawar sweat!

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालय ओबीसी आरक्षणाबद्दलचा निर्णय कधीही देईल.
त्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. त्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज राहा, अशा सूचना देण्यात भाजपच्या राज्य नेतृत्त्वाकडून जिल्हा पातळीवर देण्यात आलेल्या आहेत.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या नेत्यांच्या निवडणुका मानल्या जातात. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या मानल्या जातात. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त असते.
अशा परिस्थितीत स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुरु केली आहे. एकला चलो रेसाठी तयार राहण्याची सूचना जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांनुसार, एप्रिलच्या अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू शकतात. या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळ आजमवणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला आणि अन्य जिल्ह्यांचा दौरा करत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी त्यांनी पक्षाच्या ताकदीचा आढावा घेतला. पक्षविस्तारासाठी प्रयत्न करा आणि स्वबळावर लढण्याच्या संधी पडताळून पाहा, अशा सूचना यावेळी प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आल्या.
प्रत्येक पक्ष आपला विस्तार करु शकतो. आम्हीदेखील तेच करत आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसदेखील विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कधीही येऊ शकतो.
त्यामुळे आम्ही निवडणुकांची तयारी सुरु केलेली आहे, असं बावनकुळेंनी सांगितलं. अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात,
अशी मागणी पक्ष संघटनेतून होऊ लागली आहे. स्वबळावर लढण्याचा जोर वाढू लागल्यानं भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका घेण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यंदा महायुती आहे.
पण २०२९ मध्ये आपण स्वबळावर लढणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर भाजपनं विधानसभेला १३२ जागा जिंकत राज्यात पहिल्यांदाच आपली उच्चांकी कामगिरी नोंदवली.
आता मिशन शतप्रतिशतची तयारी भाजपनं सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत न लढता स्वबळावर लढविणे, असे वक्तव्य म्हणजे अपरिपक्वपणाचे लक्षण आहे, असे खडे बोल महायुतीतील नेत्यांना संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहेत,
तर संजय राऊत यांच्या नेत्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल करावे. राऊत हे मनोरुग्ण आहेत, अशी बोचरी टीका जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांच्या निधनानंतर परिचारक यांच्या सांत्वनपर भेटीसाठी पाटील पंढरपुरात आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राजकीय पक्ष राज्याचा एक निर्णय कधीच करीत नाहीत.
स्थानिक पातळीवर संबंधित शहरात कोणाचे किती काम आहे, यावरून निर्णय घेतले जात असतात. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर प्रभाग रचना होईल. मगच निवडणुकांबाबत निर्णय होईल.
आता बोलणे उचित नाही, असे पाटील म्हणाले. तर सांगोला उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे आवाहन संपुष्टात आले आहे. त्यांच्या संबंधी काय बोलायचे, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला, तर संजय राऊत यांच्या विषयी प्रश्न विचारला असता विखे पाटील यांनी बोचरी टीका केली.
एखाद्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यावर त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेतात. आता राऊत यांच्या नेत्यांनी त्यांना दवाखान्यात न्यावे. ते मनोरुग्ण झाले आहेत, असे विखे पाटील म्हणाले.
तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळूउपशाबाबत आता अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. जो कोणी वाळू चोरी करेल,
त्याच्यावर संबंधित अधिकारी कारवाई करतील आणि जर अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करणार, असा सज्जड दम पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भरला.