मनोज जरांगें पाटलांचे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण

 

 

 

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राज्यातील सर्व मोठे नेते सध्या प्रचारात व्यग्र असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

 

महाविकास आघाडी आणि महायुती आमने-सामने असून आपली सत्ता यावा यासाठी मतदारांना आवाहन करत आहेत. दरम्यान या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षण समर्थकांचा प्रभाव पडणार का?

 

याची चिंता अनेक नेत्यांना आहे. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार नसलो तरी काही नेत्यांना पाडणार असल्याचा इशाराही दिला आहे. त्यातच आता त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

 

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरू करा, असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला दिलं आहे.

 

मनोज जरांगे जालनाच्या अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याचंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. तर हे भारतातलं सर्वात मोठं आमरण उपोषण असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे.

 

दानवेंनी लाथ मारली,तो कार्यकर्त्यासाठी सन्मान असला तरी तो अवमानच असल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे.

 

बबनराव लोणीकर यांचं मराठा समाजाच्या बाबतीत असलेलं वक्तव्य खेदजनक असून त्यांना रस्त्यावर आणायची ताकद मराठ्यांमध्ये आहे असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मी समाजाच्या आरक्षणासाठी लढता लढता मरणार असं सांगत मनोज जरांगे यांनी सरकार कुणाचंही येवो त्यांच्यासमोर आमचं आव्हान असेल असं स्पष्ट केलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *