EVMऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या;आता जिल्हास्तरावरूनही होतेय मागणी
Realizar elecciones mediante papeletas de voto en lugar de mediante EVM; ahora también existe una demanda a nivel de distrito.
ईव्हीएम मशीन संदर्भात विविध चर्चा विचर्चा सुरू आहेत. ईव्हीएम संदर्भात आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. त्यामुळे
आगामी काळातील सर्वच निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्षांनी जिल्हा प्रशासनास केली आहे.
यावेळी विविध पक्षांच्या पदाधिका-यांनी ईव्हीएम मशीन कायमस्वरूपी हद्दपार करण्यात यावी अशी मागणी केली. बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्यावे अशी मागणी देखील बुलढाणा येथील प्रशासनास पदाधिका-यांनी केली.
यावेळी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह, वकील संघाच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले.
दरम्यान या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल असे शिष्टमंडळास आश्वासित करण्यात आले आहे.
दरम्यान येणाऱ्या सर्व निवडणुका या ईव्हीएम वर न घेता बॅलेट मशीन वर घ्यावी अशी मागणी मंगळवेढ्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रा. येताळा भगत,अॅड राहुल घुले, राजाभाऊ चेळेकर,अॅड रविकरण कोळेकर,अॅड भारत पवार,
दत्तात्रय भोसले, प्रथमेश पाटील,पांडुरंग जावळे,एकनाथ फटे,विष्णुपंत शिंदे,पांडुरंग निराळे,समाधान हेंबाडे,अशोक माने, सिदराया माळी,अंकुश शेंबडे,अशोक सोनवणे,राकेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की येणाऱ्या काळातील लोकसभा विधानसभा व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी असून तशा प्रकारची निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपात सर्व पक्षांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनामध्ये नमूद केला यावेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील इतर प्रश्नावर चर्चा केली.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी दुष्काळात तालुका समावेश झाल्यामुळे सर्वच मंडलला सरसकट पिक विमा देण्याची मागणी केली, येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्याची सर्वपक्षीयाची मागणी शासनाला कळवावी,अशी मागणी करण्यात आली आहे