मराठवाड्यातील उमेदवाराने चक्क दिले मतदारसंघातील मुलांचे लग्न लावून देण्याचे आश्वासन

The candidate from Marathwada promised to marry the children of the constituency

 

 

 

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अशातच उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे.

 

अशातच बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी तरुण मतदारांना एक अजब आश्वासन दिलं होतं.

 

मी जर आमदार म्हणून निवडून आलो तर मतदारसंघातील सर्व मुलांचे लग्न लावून देतो असं ते म्हणाले होते. या आश्वासनावर धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

 

या मुलांचे लग्न लावून देण्यासाठी तुम्ही मुली आणणार कुठून? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. यावर पुन्हा एकदा देशमुख यांनी मुलांची लग्न नेमकी कशी लावून देणार? याला उत्तर दिले आहे.

 

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्यात राजकीय लढत आहे.

 

दोघांकडूनही आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच राजेसाहेब देशमुख यांनी भर सभेत तरुणांना लग्न लावून देण्याचे अजब आश्वासन दिले.

 

याची चर्चा संबंध राज्यभरात झाली. यालाच प्रत्युत्तर म्हणून या मुलांच्या लग्नासाठी मुली आणणार कुठून? तसेच तुमच्या जुन्या पक्षातील राष्ट्रीय नेत्याचेच लग्न झाले नाही म्हणत मुंडेंनी टीका केली होती. मात्र आता याच टीकेला राजसाहेब देशमुख यांनी इंटरेस्टिंग उत्तर दिलं आहे.

 

मतदार संघातील जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिलं तर मतदार संघात उद्योगधंदे निर्माण करू त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. परिणामी मुलींचे आई वडील त्या मुलाशी लग्न लावून देतील.

 

त्यामुळे हे लग्न मीच लावून दिल्यासारखे आहे, असं उत्तर देशमुख यांनी दिलं आहे. शिरसाळा येथे राजेसाहेब देशमुख यांची ग्रामस्थांनी घोड्यावर विजयी मिरवणूक काढली या दरम्यान ते बोलत होते.

 

धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. कारण बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा फॅक्टर प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत दिसून आला आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

 

परळी मतदारसंघात शरद पवारांनी मराठा कार्ड देऊन खेळी खेळली आहे. त्यामुळे परळी मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा ही लढत होत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *