भर सभेतच म्हणाले ओवेसी म्हणाले ‘आय लव्ह यू’;नेमकं काय घडलं?

Owaisi said 'I love you' in the whole meeting; what exactly happened?

 

 

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. आगामी तीन दिवसांनंतर प्रचार संपणार असल्यामुळे नेते मंडळी दिवसरात्र एक करून लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

 

एमआयएम या पक्षानेही विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी या पक्षाकडून पूर्ण ताकदीने प्रचार केला जातोय.

 

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीने ओवैसीदेखील प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या महाराष्ट्रात हजारोंच्या सभा होत आहेत. दरम्यान,

 

त्यांच्या सोलापुरातील एका सभेची सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे. भर सभेत ते मंचावरून आय लव्ह यू म्हणाले आहेत.

एमआयएम या पक्षाने सोलापूर मध्य या मतदारसंघात फारूक शाब्दी यांना तिकीट दिलं आहे. त्यांच्या प्रचारासाठीच ओवैसी यांची या भागात एक जाहीर सभा बोलवण्यात आली होती.

 

या सभेत ओवैसी जोरदार भाषण करत होते. मात्र अचानकपणे त्यांना एक लेटर मिळालं. खरं म्हणजे सोलापूर पोलिसांनी त्यांना एक नोटीस दिली होती. याच नोटिशीवर असदुद्दीन ओवैसी बोलत होते.

याच नोटिशीबाबत नंतर ओवैसी यांनी भाषण करताना सविस्तरपणे सांगितलं. मी मंचावर बसलो होतो. बसलेला असतानाच कोणीतरी माला एक कागद दिला. त्या कागदात काय आहे, हे सांगतो.

 

खूप मजेदार लिहिलेलं आहे यात. मला जेलरोड पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कलम 168 बी एनएसएस नुसार नोटीस दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

तसेच, त्यांनी मला लव्ह लेटर दिलं आहे. माझ्या सासऱ्यांकडून ही नोटीस आली आहे. दे जावयावर फार प्रेम करतात. ते आमचे सासरे आणि भाऊपण आहेत.

 

आय लव्ह यू. त्यांचे फक्त माझ्यावर प्रेम आहे, दुसऱ्यांवर प्रेम नाही, असे ओवैसी मिश्किलपणे म्हणाले. ओवैसी यांच्या या मिश्किल टिप्पणीमुळे सभेत एकच हशा पिकला.

 

 

दरम्यान, एमआयएम हा पक्ष या विधाानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रचारात उतरला आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेमक्या किती जागा येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *