ठाकरे गटाला धक्का; दोन बडे नेते कार्यकर्त्यांसह शिंदे गटात

A shock to the Thackeray group; Two big leaders in Shinde group along with activists ​

 

 

 

 

शिवसेना पक्षात दोन गट पडल्यापासून अनेक नेत्यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत.

 

 

अशातच ठाकरे गटातील नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडीचे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी हांडे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. हांडे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

 

 

आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहेत. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार,

 

 

खासदार यांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता हांडे यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

 

ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडीच्या प्रभाग क्रमांक 128 चे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि माजी नगरसेविका अश्विनी हांडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काल (शनिवारी) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी हांडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत केलं. तसंच त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव सुशांत शेलार आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

हांडे यांच्यासोबतच ठाकरे गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच उपशाखाप्रमुख राजूभाई शिर्सेकर,

 

 

हसमुख महाराज रावल, रमाकांत झगडे, रोहित बोऱ्हाडे, अमोल गाढवे, राकेश बोढेकर, युवा सेना अधिकारी संतोष मोरे, चंद्रकांत कुंजीर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

 

 

या पक्षप्रवेशाची माहिती आणि फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *