महारष्ट्रात सर्वाधिक मतदान झालेले टॉप 15 मतदारसंघ
Top 15 constituencies with highest voter turnout in Maharashtra

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का वाढला आहे.
राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्क्यात लक्षणीय वाढ झाली आहे. एखाद्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यास तो साधारणत: सत्तापालटाचा संकेत समजला जातो.
त्यामुळे राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये वाढलेले मतदान प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे नेमके काय घडणार, हे आता 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीत राज्यात 61.29 टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांच्या आसपास होती.
त्यामुळे अंतिम आकडेवारीत मतदानाच्या टक्क्यात भर पडून तो 68 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात कागल मतदारसंघात सर्वाधिक 81 टक्के मतदान झाले.
अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर मुंबईत नेहमीप्रमाणे सर्वाधिक कमी मतदान झाले आहे. मुंबईत अवघ्या 52.07 टक्के, उपनगरात 55.77 टक्के आणि ठाण्यात 56.05 टक्के मतदानाची नोंद झाली.
राज्यात सर्वाधिक मतदान झालेले टॉप 15 मतदारसंघ
करवीर – 84.01
चिमुर – 81.75
कागल – 81.72
ब्रह्मपुरी – 80.54
सिल्लोड – 80
नेवासा- 79.89
शाहूवाडी – 79.04
पलूस कडेगाव – 79.02
नवापूर – 78.70
शिराळा – 78.47
राधानगरी – 78.26
शिरोळ – 78.06
सांगोला – 77.90
दिंडोरी – 77.75
विक्रमगड – 77.75
सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघांचे विद्यमान आमदार कोण?
करवीर – काँग्रेस आमदार दिवंगत पी एन पाटील सडोलीकर
चिमुर – कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
कागल – हसन मुश्रीफ (अजित पवार गट)
ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
सिल्लोड – अब्दुल सत्तार (शिंदे गट)
नेवासा- शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष-मविआ)
शाहूवाडी – विनय कोरे (जनसुराज्य-महायुती)
पलूस कडेगाव – डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
नवापूर – शिरीष नाईक (काँग्रेस)
शिराळा – मानसिंग नाईक (शरद पवार)
राधानगरी – प्रकाश आबिटकर (शिंदे गट)
शिरोळ – शिवसेना आमदार
सांगोला – शहाजीबापू पाटील (शिंदे गट)
दिंडोरी – नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)
विक्रमगड – सुनिल भुसारा (शरद पवार गट)
2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2024 निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या मतदान टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांच्या वाढत्या मतदानाचा फायदा कोणाला असा सवाल उपस्थित होत आहे. तर पुरुषांच्या मतदानात एकूण तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 67.97 टक्के मतदान झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 5.37 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सर्वाधिक 78.01 टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात झाले. तर सर्वात कमी 56.08 टक्के मतदान नाशिक मध्य मतदारसंघात
2019 मध्ये महिलांचे मतदान 58.01 टक्के, तर 2024 मध्ये महिलांचे मतदान 66.93 टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. महिलांच्या मतदानामध्ये यंदा 8.92 टक्क्यांनी वाढ झाली आहे.