काँग्रेसकडून विधान परिषदेला मुस्लिम उमेदवार न दिल्याने समाजात नाराजी

Displeasure in society due to Congress not giving Muslim candidate to Legislative Council

 

 

 

 

विधान परिषदेचा रिक्त असलेल्या 11 जागा साठी येता 22 जुलैला मतदान पार पडणार आहे 11 पैकी पाच जागावर भाजप शिवसेना आणि शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी प्रत्येक दोन जागा निवडणूक लढवणार आहेत.

 

 

 

शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गेट ही प्रत्येकी एकेक जागेवर लढणार आहेत ,लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाकडून महाविकास आघाडीला भरभरून मतदान करण्यात आले,

 

 

 

त्यामुळे आता विधान परिषदेत काँग्रेस कडून परभणीचे ,शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस नेते नदीम इनामदार यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र उमेदवारी देण्यात आली नसल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे,

 

 

भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेसाठी पास उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये पंकजा मुंडेंना देखील पक्षाकडून संधी देण्यात आली आहे

 

 

मराठवाड्यातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत भाजप त्यांचे पुनर्वसन करण्याची तयारीत आहे, यादरम्यान विधान परिषदेत भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या गटाला संधी मिळेल अशी चर्चा होती,

 

 

चव्हाण यांच्या नातलग असलेल्या डॉक्टर मीनल पाटील खतगावकर यांच्यासाठी प्रयत्न देखील करत होते, मात्र भाजपने चव्हाण गटाला संधी दिली नाही ,त्यामुळे सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळात

 

 

 

आणि त्यानंतर आता विधान परिषदेची संधी न मिळाल्याने चव्हाण गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे, अशोक चव्हाण भाजपवासी झाल्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली ,

 

 

 

निवडणुकीनंतर नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार आणि मोठी जबाबदारी भाजप देणार अशी चर्चा होती, परंतु असे काही झालेले नाही लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे ,

 

 

 

अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर देखील पक्षाला नांदेडची जागा राखता आली नाही ,तत्पूर्वी राज्याच्या विधान परिषदेसाठी भाजपकडून माजी मंत्री अशोक चव्हाण यांचे नातेवाईक

 

 

तथा माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉक्टर मीनल पाटील खतगावकर यांच्या नावाची चर्चा होती ,मात्र त्यांना पक्षांना उमेदवारी दिली नाही

 

 

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉक्टर मीनल पाटील या भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या, त्यांना लोकसभेचे उमेदवारी मिळावी यासाठी अशोक चव्हाण सुद्धा प्रयत्नशील होते ,

 

 

 

लोकसभा निवडणुकीआधी मीनल पाटील खातेगावकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला आणखीन बळ मिळाले होते मात्र भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली ,

 

 

 

नाराज असलेल्या मीनल खादगावकर यांना विधान परिषदेत घेण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे वृत्त चर्चेत होते माजी मंत्री रावसाहेब दानवे नांदेड दौऱ्यावर आले असता

 

 

 

त्यांनी खातगावकरांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे यासाठी चव्हाण गटाकडून दानवे यांच्याकडे शिफारस करण्यात आली होती ,

 

 

 

माजी खासदार भास्करराव पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात पंधरा मिनिटे बंद दाराआड चर्चा देखील झाली होती ,मात्र नांदेडला संधी न देता बीडमधून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे चव्हाण समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *